Ticker

6/recent/ticker-posts

लोणार तहसील कार्यालयाला आले पारध्याच्या पाला चे स्वरूप


लोणार :अनिल वायाळ प्रतिनिधी                                    

पारधी समाजाला उदरनिर्वाह करण्यासाठी आणि राहण्यासाठी घराची व्यवस्था करण्यात येऊन शेत जमीन भाडेतत्त्वावर देण्यात यावी यासाठी दिनांक 22 फरवरी 2024 पासून तालुक्यातील खुरमपूर व इतर गावातील पारधी समाजातील लोक एकत्र येऊन तहसील कार्यालयासमोर मुलाबाळासह जनावरे आणून ठाण मांडून बसल्याने तहसील कार्यालयाला पारध्याच्या पालाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

तालुक्यातील खुरंपुर व इतर गावातील पारधी बांधव एकत्र येऊन त्यांनी दिं २०  फरवरीला तहसीलदार यांना निवेदन दिले. आणि त्यामध्ये त्यांनी सांगितले पारधी समाज बुलढाणा जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावातील रहिवासी असून आम्हाला उदरनिर्वाह करण्यासाठी भाडेतत्त्वावर जमीन व राहण्यासाठी घराची व्यवस्था करण्यात यावी असे न केल्यास आम्हाला लोकशाही मार्गाने आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करावे लागेल. आंदोलनादरम्यान आमच्या जनावराचे काही बरे वाईट झाल्यास शासन व प्रशासन जबाबदार राहील.

या आंदोलनात पारधी बांधव महिला मुलाबाळासह जनावरे घेऊन तहसील कार्यालय समोर तंबू टाकून बसले आहेत. यामुळे तहसील कार्यालयाच्या परिसरात घाणीचे साम्राज्य वाढले. सर्व विधी उघड्यावर करत असल्या चे तेथील उपस्थित मंडळी बोलत होती. याकडे वरील पातळीवरून लक्ष देण्याची गरज आहे.

यासंदर्भात तहसीलदार जोशी यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की आम्ही त्यांना पत्र तयार करून आपल्या मागण्या शासनाकडे पाठवीत आहोत. ते पत्र सुद्धा त्यांनी घेण्यास नकार दिला . त्यांच्या निवेदनावर 32 बांधवांच्या सह्या असल्याचे निवेदन आढळून आले.