गंगाराम उबाळे प्रतिनिधी सिंदखेड राजा
सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा येथून ८ किमी अंतरावरील लव्हाळा फाट्याजवळ आयशर आणि कारच्या झालेल्या भिषण अपघातात एक जण ठार झाला असून तीन जण जखमी झाले असल्याचे वृत्त हाती आले आहे. जखमईस संभाजीनगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.. आज ता.९ चे सकाळी ३.०० चे सुमारास झालेला हा अपघात एवढा भिषण होता की या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे.एवढा मोठा अपघात होऊनही आज ता.९ चे सायंकाळी ६.०० पर्यंत येथील पोलिसात घटनेची फिर्याद देण्यासाठी कुणीही न आल्याने घटनेची कोणतीही नोंद नसल्याचे पोलिसांनी सांगितले.याबाबत सविस्तर असे की,साखर खेर्डा पोलीस स्टेशन हद्दीत लव्हाळा फाटा जवळीत पॉवर हाऊस समोर आयशर व कारच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले.ता. ९मार्च चे उत्तररात्री पावणेतीन वाजता ही दुर्घटना घडली.
स्टेट बॅंकेचे लॉकर घेऊन धुळे येथून हैदराबाद जाणारा आयशर क्र. एम एच १८ - बी जी ८२२५ चालक सुनिल कोळी रा धुळे याने औंढानागनाथ येथून दर्शनाहून बुलडाणा येथे निघालेल्या होन्डा एमेझ क्र एम एच २८/ बी के १७ ९५ ला जोरदार धडक दिली. त्यामुळे कार मधील वैभव रामकृष्ण लोखंडे याचा चिखली येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच सागर एकनाथ सुरुशे, आदित्य गजानन सुरुशे सर्व रा. सुंदरखेड ,बुलडाणा हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचेवर संभाजीनगर येथे उपचार सुरू आहेत. अविनाश पंजाब गव्हाणे रा सुंदरखेड बुलडाणा हा किरकोळ जखमी आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोहेकॉ कडूबा डोईफोडे, पो कॉ लक्ष्मण ईनामे, पो कॉ. राजेश गीते, पो कॉ मेहेर यांनी घटनास्थळी मदत केली. दरम्यान पोलीसांनी आयशर चालकास ताब्यात घेतले आहे.पुढील कारवाई सुरू आहे.
@फोटो:-/साखरखेर्डा/- येथून जवळच असलेल्या लव्हाळा फाट्याजवळ झालेल्या अपघातात क्षतिग्रस्त झालेली कार.अपघातात मृत्यूमुखी पडलेला वैभव रामकृष्ण लोखंडे.





Social Plugin