शेवगाव --- जयप्रकाश बागडे
साईंच्या पदस्पर्शाने पुणीत झालेल्या साईबाबांच्या शिर्डी या नगरीत ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी.फिल्म प्रोडक्शन निर्मित साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार 2024 हा भव्य व दिव्य पुरस्कार सोहळा शिर्डी पासुन जवळच साकुरी येथे आशा सिद्ध संकल्प लाॅन येथे सायंकाळी ठिक 6.ते.10.वाजेपर्यंत हा साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार वितरण समारंभ होणार असल्याची माहिती पुरस्कार सोहळा समितीचे सर्वेसर्वा सुदामराव संसारे सर यांनी दिली ,
हा पुरस्कार सोहळा राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार सोहळा आहे , अतिशय सुंदर लखलखीत व रंगबेरंगी विद्युत रोषणाईत व भव्य स्क्रिन लावुन निसर्गरम्य परिसरात होत आहे.या पुरस्कार सोहळा समितीचे सर्वेसर्वा सुदाम संसारे सर व त्यांचे समितीतील सर्व सहकारी हा पुरस्कार सोहळा यशस्वी करण्या साठी खुपच परिश्रमपूर्वक मेहनत घेत आहेत , महाराष्ट्र राज्यातील अतिशय प्रतिष्ठेचा व सन्मानाचा असा हा पुरस्कार सोहळा असून सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्यातील नामांकित मान्यवर येणार आहेत. पुणे येथील नामांकित सिने क्षेत्रातील प्रसिद्ध दिग्दर्शक,निर्माता;व अभिनेता काळुराम ढोबळे सर तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रेक्षक वर्गाचे लक्ष वेधुन घेणारी प्रसिद्ध सुंदरी माॅडेल व सिने तारका सावी उर्फ सोनी वासनिक मॅडम .यांच्या उपस्थितीत व लोणी प्रवरा नगर येथील भूमिपुत्र समाजभूषण उत्तम काका घोगरे पाटील व औरंगाबाद येथील प्रसिद्ध उद्योजक व सिने क्षेत्रातील निर्माता सतिष खांडविकर सर. यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे ,तरी आपण सर्व या भव्य व दिव्य पुरस्कार सोहळ्यास यावे असे आवाहनही सुदाम संसारे.सर यांनी केले आहे ,पुरस्कार सोहळ्याच्या उपाध्यक्षा.सौ.वंदना मिलिंद गव्हाणे मॅडम,कार्याध्यक्ष. राज भालेराव सर,सल्लागार. डाॅ.अजय वारुळे.सर.सचिव. सिमा सपकाळ.मॅडम.सरचिटणीस. राजुभाई शेख सर. व सर्व सदस्य मेहनत घेत आहेत.





Social Plugin