Ticker

6/recent/ticker-posts

शेतकऱ्यांच्या न्याय्यहक्क मागण्यासाठी ०७ मार्च रोजी लोणार तहसीलवर तीव्र निदर्शने -- डॉ.गोपाल बछिरे

 


बुलढाणा:अनिल वायाळ प्रतिनिधी           

लोणार ६ शेतकरी राजा यांच्या न्याय्यमागण्या साठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने लोणार तहसील कार्यालयावर ७ मार्च रोजी तीव्र निदर्शने करण्यात येणार आहे याकरिता मोठ्या संख्येने शेतकरी व शिवसैनिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे यांनीनकेले आहे. 

त्याचबरोबर तीव्र निदर्शने करूनही जर शासन जागे झाले नाही तर तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढण्यात येईल असे ही सांगितले शेतकऱ्यांच्या मागण्या पुढीलप्रमाणे

१ ) लोणार मेहकर तालुक्यात  झालेल्या गारपीटीमुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्याच्या शेतीचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी. 

२) सन २०१९-२० ला ठाकरे सरकारने ज्याप्रमाने सोयाबीन ला ८००० व कापसाला ११००० रुपये दिला होता तोच भाव द्यावा.

३) दुष्काळाचे अनुदान अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाही दे त्वरित देण्यात यावे.

४) पीक विम्याची रक्कम अद्याप शेतकऱ्यांना दिलेली नाही पूर्ण पीक विमा शेतकऱ्यास देण्यात यावा. 

५) अतिवृष्टीची आर्थिक मदत अद्याप सर्व शेतकऱ्यांना मिळालेली नाही ती सर्व शेतकऱ्यांना देण्यात यावी.

६) शेतकऱ्यास कृषी विभागाकडून मिळणारी सबसिडी गत दोन वर्षात दिलेली नाही ती त्वरित देण्यात यावी.

७) वर्ष २०१२-१३ व २०१६-१७ मध्ये केलेली कर्जमाफी योजनेचा लाभ निम्म्यापेक्षा जास्त शेतकऱ्यास मिळालेलाच नाही ते देण्यात यावा.

 ८) वन्यप्राणी रोहि (निलगाय) जंगली डुकरे, हरीण यांच्याकडून झालेल्या पिकांची नुकसान भरपाई त्वरित देऊन वन्य प्राण्यांच्या

त्रासापासून शेतकऱ्यांची सुटका करण्यात उपाय योजना करावी. 

९) शेतकऱ्यास विना खंड अखंडपणे आठ ते बारा तास शेतीसाठी वीजपुरवठा करण्यात यावा.

 मेहकर लोणार तालुक्यातील शेतकरीराजा यांच्या संबंधित या नऊ मागण्या विषयी तातडीने 6 मार्च पर्यंत शासनाने निर्णय घ्यावा व मागण्या पूर्ण करण्यात याव्या अन्यथा शासन व प्रशासन यांच्या निषेधार्थ  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षच्या वतीने लोणार येथील तहसील कार्यालयावर दि. ०७ मार्च रोजी सकाळी ११ वाजे पासून तीव्र निदर्शने करण्यात येणार आहे. या तीव्र निदर्शनास सर्व शेतकरी बंधू भगिनी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना ऊबाठा चे डॉ. बछिरे यांचे सह जिल्हा उपप्रमुख आशिषभाऊ रहाटे, लोणार तालुका प्रमुख ऍड दीपक मपरी मेहकर तालुका प्रमुख लिंबाजी पांडव लोणार शहर प्रमुख गजानन जाधव, मेहकर शहर प्रमुख किशोरभाऊ गारोळे, युवातालुकाधिकारी मेहकर ऍड आकाश घोडे, लोणार युवातालुकाधिकारी जीवन घायाळ, कृ.उ.बा.स. संचालक विजय मोरे, तेजराव घायाळ, तालुका उपप्रमुख परमेश्वर दहातोंडे, श्रीकांत नागरे, तालुका संघटक कैलास अंभोरे, महिला तालुकाप्रमुख संजीवनी वाघ, युवा सहरप्रमुख श्रीकांत मदनकर, प्रकाश सानप, सुधन अंभोरे, शाम राऊत, राजुभाऊ बुधवत, विठ्ठलराव घोडके, तानाजी मापारी, लुकमान कुरेशी,  उमर सय्यद, इकबाल कुरेशी, अमोल सुटे, तानाजी अंभोरे, अश्रुबा धारकर,पंढरी सुलताने, गफार शहा, लालूभाई मुल्लाजि, गोपाल खोतकर, वसीम शेख, राजू दहातोंडे, भागवत दहातोंडे, फिरोज खान पठाण, ज्ञानेश्वर सरोदे, अजय बछिरे, किरण कमडे यांनी केले आहे.