Ticker

6/recent/ticker-posts

गुरूपिंप्री परिसरातील मोसंबीच्या बागा पाण्याअभावी होत आहेत नष्ट


हर्षदा कोल्हे ग्रामीण प्रतिनिधी 

गुरूपिंप्री : गुरूपिंप्री परिसरात मागील काही दिवसान पासुन मोठ्या प्रमाणात मोसंबीच्या बागा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. मोठ्या प्रमाणात मागील दिवसांन पासुन उष्णतेचे प्रमाणा वाढलेले आहे. या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस कमी पडल्याने पाण्याची पातळी ही खुप कमी झाली आहे. या सुरुवातीला काही प्रमाणात पाऊस पडला व त्या नंतर त्या सुरुवातीच्या पावसात थोड्या प्रमाणात शेतकरी वेगवेगळे पिके घेऊन आपले उत्पन्न काढले, त्यात सोयाबीन, कापूस व तुर याचे उत्पादन काही प्रमाणात झाले. 

मागील काही दिवसांन पासुन या परिसरात मोठ्या प्रमाणात या  मोसंबीच्या बागा पावसा अभावी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. आधीच पाऊस कमी झाला व त्यात वाढते उष्णतेचे प्रमाणात या मुळे पाण्याची पातळी ही खुप कमी झाली आहे. मोठ्या प्रमाणात शेतकर्यांची विहीर व बोर मधील पाणी हे खुपच कमी झाले आहे, त्यामुळे ज्यांच्याकडे मोसंबी बागा आहेत त्या पाण्या अभावी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. विविध प्रकारच्या बागा या शेतकरी जीवापाड त्याची देखरेख करत असतो. आपल्या शेतात विविध बागा या पाण्याचा अभाव नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

शेतकरी मोठ्या प्रमाणात आपले कुटुंब हे शेतीच्या जीवावर घेऊन चालत असतो, विविध संकट हे शेतीच्या मागे चालु असतात. शेतकरी कधी दुष्काळ, महापुर, शेतीच्या मालाला कमी भाव यामुळे सदैव संकटात आहे. या संकाटा मुळे मोठ्या प्रमाणात शेतकर्याची आर्थिक स्थिती बिकट होण्याच्या मार्गावर आहे. आज शेतीला पाणी मिळणे खुप गरजेचे आहे. पाण्या शिवाय शेतीमध्ये उत्पादन होऊ शकत नाही. या वर्षी शेतकरी हा मोठ्या चिंतेत आहेत. आज पाण्या अभावी पिण्याच्या पाण्याचे ही मोठे संकट उभा राहिले आहे, या सर्व संकटाचा सामना शेतकरी करत आहे.