Ticker

6/recent/ticker-posts

विद्युत अधिकाऱ्यांची पठाणी वसुली वरिष्ठ अधिकाऱ्यांची ग्राहकांसोबत अरेरावी

 


शेख बाबा (लोणार  प्रतिनिधी)

मेहकर व परिसरात विद्युत अधिकाऱ्यांची ग्राहकांकडून मार्च महिन्याच्या नावावर पठाणी वसुली होत असून ग्राहक मात्र त्रस्त झाले आहेत. हेच नव्हे तर बाहेरून येणारे महावितरणचे वरिष्ठ अधिकारी ग्राहकांना अरेरावीची भाषा करून विद्युत पुरवठा खंडित करण्याची धमकी देत असल्याचे दिसत आहे सोबतच हे अधिकारी एखाद्या ग्राहकांच्या मागे लागले तर नेहमी नेहमी त्याच ग्राहकाला मनस्ताप देत असल्याचे दिसून येत आहे.

ज्यामुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत एखाद्या ग्राहकाने पैसे भरण्यासाठी वेळ मागितला तर वरिष्ठ अधिकारी अरेरावी करून स्थानिक कर्मचाऱ्यांसोबत डायरेक्ट विद्युत पुरवठा खंडित करतात ज्यामुळे ग्राहकांची समाजामध्ये बदनामी होते.ग्राहकांना वेठीस धरने कितपत योग्य आहे हे संबंधित झोनल अधिकारी यांनी लक्ष देऊन योग्य त्या सूचना आपल्या कर्मचाऱ्यांना द्यावा व त्यांची ग्राहकांसोबत असलेली गैरवागणूक थांबवावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे