घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद.
प्रतिनिधि : कृष्णा महाले उल्हासनगर
उल्हासनगर मध्ये जुन्या वादातुन एका तरुणावर सहा जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे.ही घटना कल्याण -बदलापूर रस्त्यावरील महाराजा हॉल समोर घडली आहे.हल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.चिंकू लबाना हा तरुण त्याच्या मित्रासह कल्याण -बदलापूर रस्त्यावर उभा होता.त्यावेळी मागून आलेल्या सहा जणांच्या टोळक्याने चिंकू लबाना ला मोटर सायकलवरून खाली खेचून मारहाण करण्यात आली आहे.यात चिंकू लबाना हा तरुण गंभीर जखमी झाला असुन त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.घटनेचा गुन्हा मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.





Social Plugin