प्रतिनिधी:- अनुसंगम शिंदे(राहुरी)
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राहुरी,जिल्हा: अहमदनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित "जागर भीम विचारांचा" हे राज्यस्तरीय भिमकाव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धसाठी प्रथम पारितोषिक रु.५०००/ रोख, सन्मानचिन्ह,सन्मानपत्र,शाल, द्वितीय पारितोषिक रु.३०००/- रोख,तृतीय पारितोषिक रु.२०००/- रोख,सन्मानचिन्ह, सन्मानपत्र,शाल,उत्तेजनार्थ २ पारितोषिके स्वरूप रु.१०००/ रोख,सन्मानचिन्ह,सन्मानपत्र,शाल व सहभागी सर्व कवींना सन्मानचिन्ह,सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
तरी या काव्यस्पर्धेसाठी महाराष्ट्रातील कवींनी सहभागी होण्याचे आवाहन रिपाइं चे जिल्हा अध्यक्ष मा.सुरेंद्रभाऊ थोरात यांनी केले आहे.नोंदणी फी रु.२००/- असून १०० कवींचा सहभाग असणार आहे.तरी लवकरात लवकर कवींनी आपली नोंदणी करावी,नोंदणीसाठी संपर्क - अनुसंगम शिंदे(मोबाईल ९५०३९५९९५७)
काव्यस्पर्धा यशस्वी होण्यासाठी रिपाइं आठवले गटाचे अहदनगर जिल्हा अध्यक्ष सुरेंद्रभाऊ थोरात,शिक्षक आघाडी चे अहदनगर जिल्हा अध्यक्ष अनुसंगम शिंदे, रिपाइं राहुरी तालुका अध्यक्ष विलासनाना साळवे,शिक्षक नेते बाबासाहेब बोडखे, ज्येष्ठ नेते शिरीष गायकवाड, विकास अधिकारी अजिंक्य शिंदे, डॉ. दिपक गायकवाड,योगेश चुत्तर, सनी साळवे,भूषण साळवे, महमदभाई ईराणी,निसारभाई पिंजारी, धनंजय पुरोहित,पंकज लगे प्रयत्नशिल आहेत.
.jpg)




Social Plugin