Ticker

6/recent/ticker-posts

देहु : देहुमध्ये ‘ एक गाव एक शिवजयंती ‘ मोठ्या उत्साहात साजरी.



समाधान भुसारे ग्रामीण प्रतींनिधी

 देहु येथे ‘ एक गाव एक शिवजयंती’ चे आयोजन समस्त ग्रामस्थांच्या देहुकरांच्या वतीने करण्यात आले होते. शिवजयंतीनिमित्त मुख्य कमान आकर्षकरित्या विदुतरोषणाई ने सजवण्यात आले होते.  केलेल्या सुशोभीकरणाच्या कामामुळे तेथील सौंदर्यात आणखी भर पडली आहे.मिरवणुकीत वेगवेगळे देखावे साकारण्यात आले होते. संत तुकाराम महाराज वैकुंठगमन रथ त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज रथ व इतर खुप सारे देखावे होते.प्रमुख आकर्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज प्रमुख रथ ज्या मध्ये  आयोद्या येथील श्रीराम मंदिर येथील राममूर्ति व त्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज विराजमान झालेला रथ होता.  सायंकाळी   ग्रामस्थांच्या वतीने  ढोल ताश्याच्या गजरात , बँडच्या वाद्यात, फटक्यांच्या आतिषबाजीत श्रीराम मूर्ती रथात छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.  या मिरवणुकीत घोडे व शिवाजी महाराज जिवंत देखावा चे आयोजन करण्यात आले होते.   यावेळी मोठ्या प्रमाणात शिवभक्त उपस्थित होते.व इतर संस्कृतिक कार्यक्रम बघण्यासाठी समस्त शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती. सर्व शिवजयंती नियोजन  शिवजयंती उत्सव समिति क्षिक्षेत्र देहु यांनी केले होते