Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते २५९ घरांच्या आदर्श वसाहतीचे भुमिपुजन संपन्न



चाळीसगाव प्रतिनिधी अनिल राठोड

एका वर्षाच्या आत सर्व सोय सुविधांसह  सुसज्ज स्मार्ट बंजारा तांडा आदर्श वसाहत उभी करण्याचे संकल्प केले असल्याचे यावेळी आमदार मंगेश दादांनी सांगितले...पंतप्रधान मोदी आवास योजनेच्या लाभार्थ्यांना ग्रामपंचायतीच्या गावठान जागेवर आदर्श वसाहत उभी करण्याची हि अभिनव संकल्पना भविष्यात महाराष्ट्रातील बंजारा तांड्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी असा प्रयोग ठरेल, असे बिडीओ साहेबांनी सांगितले, महाराष्ट्राती बंजारा समाजाला आदर्श घालून देन्याची संधी आपल्याला मिळाली असून लाभार्थी, व ग्रामस्थांचे सहकार्य गरजेचे आहे, निसर्गाच्या कुशीत वसाहत उभी राहत असून, शहरासारखी वसाहत कशी उभी राहील असा प्रयत्न राहणार असल्याचे सांगून  मा .बिडीओ साहेबांनी सखोल असे सविस्तर मार्गदर्शन केलेत ,

भटक्या विमुक्त जमातीचा पंतप्रधान आवास योजनेत समाविष्ट करण्या कामी मोलाचे कायदेशीर मार्गदर्शन केल्याबद्दल मा. नंदकुमार वाळेकर साहेबांचे ग्रामस्थांच्या वतीने आभार मानून सत्कार करण्यात आले.उपस्थित बंजारा सरपंचांच्या आग्रहास्तव ग्रामस्थांच्या सोबत बंजारा लोक गीतावर पारंपरिक नृत्य करत मा. बिडीओ साहेबांनी भुमिपुजन कार्यक्रमाचा आनंद व्यक्त केला.भिमराव जाधव ( शेतकरी बचाव कृती समिती चाळीसगाव सामाजिक कार्यकर्ता बोढरेकर बोढरेकर  काल दि. ७. मार्चला घाट रोड बोढरे दस्तुरी फाट्यावर प.स.प्रशासन व ग्रामपंचायतीच्या वतीने भुमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,चाळीसगाव येथे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उद्घाटन समारंभ कार्यक्रम आटोपून संभाजीनगरकडे जातांना सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ग्रामविकासमंत्री यांचे हस्ते आदर्श वसाहतीच्या जागेवर कुदळ मारून भुमिपुजन करण्यात आले, 

याप्रसंगी बोलातांना मंत्री महोदयांनी सांगितले की, जे काम मला जमले नाही ते काम आमदार मंगेश दादांनी करून दाखविले, माझ्या जामनेर मतदारसंघात देखील बंजारा समाज मोठ्या प्रमाणात असल्यामुळे भविष्यात जामनेर तालुक्यातील बंजारा समाजाकडून देखील या आदर्श वसाहतीची अपेक्षा राहीलच. परंतू याची सुरुवात आपल्या बोढरे गावातून झाली आहे याची इतिहासात नोंद राहील अशी हि प्रेरणादायी संकल्पना आहे, एका वर्षभरात हि वसाहत उभी करण्याचा संकल्प आमदार मंगेश दादांनी केला असून निश्चित एका वर्षाच्या आत या ठिकाणी सर्व मुलभूत सोयी सुविधांसह , आदर्श वसाहत उभी राहील याची मला खात्री आहे, आणि त्यावेळी  वसाहतीच्या लोकार्पणाला मी आवर्जून उपस्थित राहिन असा शब्द दिला, असा हा अभिनव उपक्रम हाती घेतल्याबद्दल महाजन साहेबांनी आमदार व प्रशासनाचे अभिनंदन केले व या आदर्श वसाहत निर्माण कार्यासाठी शुभेच्छा दिल्या..

आदर्श वसाहत बरोबरच सुंदर देखना असा  संत सेवालाल भवन  बांधून भविष्यात या ठिकाणाला  पर्यटन तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देन्याचा आमदार  मंगेश दादांचा प्रयत्न राहणार आहे या बाबत कृ.उ.बा.समितीचे उपसभापती साहेबराव राठोड व गोरख भाऊ  राठोड यांनी  यावेळी माहिती दिली.प्रातिनिधिक स्वरूपात मोजक्या लाभार्थ्यांना घरकुल योजनेचे मंजूर पत्रके देण्यात आली,  कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बोढरे चे  सरपंच, ग्रामसेवक ,ग्रा.प.सदस्य, कर्मचारी, तरूण मित्र मंडळांनी मोठे परिश्रम घेतले,

याप्रसंगी कृ.उ‌.बा.समितीचे उपसभापती साहेबराव राठोड ,मा.प.स.सभापती संजू तात्या पाटील, प्रभाकर भाऊ जाधव. दिनकर राठोड ,नमो ताई राठोड ,अमोल चव्हाण ,सरचिटणीस भाजपा चाळीसगाव राम पाटील, उपाध्यक्ष भाजपा चाळीसगाव गोरख राठोड, जुनोने सरपंच,  शास्त्रीजी डांमरून, सरपंच, संतोष राठोड ,सांगवी सरपंच संतोष राठोड ,बळीराम चव्हाण सेवा नगर सरपंच, श्री मगर मुखेड सरपंच, रामदास राठोड, वागले सरपंच बळीराम चव्हाण ,लोणचे सरपंच भरत चव्हाण आंबेहोळ सरपंच विनीत राठोड युवा नेते चरण राठोड संचालक शिंदी विकासो आर आय पाटील विस्तार अधिकारी,बोरसे आप्पा विस्तार अधिकारी,  ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष येवले यांनी आभार मानले..