महाशिवरात्री सर्वत्र शिवभक्तांच्या कडून मोठ्या उत्साहात साजरी जाते केली जाते अनेक शिवमंदिरांमध्य भक्तांच्या रांगा लागून तासंतास दर्शनासाठी उभे राहून महादेवाचे दर्शन घेतले जाते महादेव भक्तांकडून उपवासाचा फराळ प्रसाद म्हणून वाटप केले जाते सर्वत्र हा महाशिवरात्री उत्सव साजरा होत असताना सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगावच्या दुर्गसेवकांनी चाळीसगाव जवळीलच भांबरवाडी येथील डोंगरात अत्यंत पुरातन दुर्लक्षित महादेव मंदिरात जाऊन शिवपिंडीवर दुग्ध अभिषेक करीत ॐ नामाचा जप करून मनोभावे या ठिकाणी महाशिवरात्री साजरी करून परिसराची साफसफाई स्वच्छता केली यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे दिलीप आबा घोरपडे सचिन पाटील गजानन मोरे दीपक राजपूत जितेंद्र वाघ श्री साठे सर चव्हाण बापू जयंत शेलार प्रितम शेलार तेजस शेलार आदी उपस्थित होते





Social Plugin