Ticker

6/recent/ticker-posts

उमरखेड तहसील कार्यालयातील नवनियुक्त तहसीलदार श्री. सुरडकर यांची अवघ्या आठ दिवसातच बदली



बाळासाहेब पवार ग्रामीण प्रतिनिधी

तहसील कार्यालय उमरखेड येथे नव्यानेच बदली होऊन आलेले तहसीलदार श्री. सुरडकर यांची अवघ्या आठ दिवसातच बदली झाल्यामुळे जनतेत चर्चेला उधाण आले आहे . तहसीलदार श्री. सुरडकर साहेब कर्तव्यदक्ष, मनमिळावू आणि सर्वांना हवे हवे असे वाटणारे अधिकारी म्हणून आठ दिवसात सर्वांना सुपरिचित झाले होते. परंतु त्यांची बदली अवघ्या आठ दिवसातच का झाली हा एक चर्चाचा विषय सध्या उमरखेड मतदार संघात चर्चेला जात आहे . 

उमरखेड तहसील कार्यालयात श्री. निलावाड नावाचे नवीन तहसीलदार रुजू होत असल्याची चर्चा आहे. निवनियुक्त तहसीलदार श्री. सुरडकर साहेब  यांची बदली का, कशामुळे व कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आली या बाबत जनतेत जोरदार चर्चा आहे. तसेच श्री. सुरडकर साहेबांची बदली होऊ नये अशी ह्या मतदारसंघातील नागरिकांची तीव्र इच्छा व मागणी आहे .