Ticker

6/recent/ticker-posts

उमरखेड येथे मा. उद्धव ठाकरे यांचा जनसंवाद मेळावा

        


बाळासाहेब पवार @ प्रतिनिधी

        उमरखेड येथे मा.श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जनसंवाद मेळावा भरगच्च कार्यकर्ते, पदाधिकारी व मतदारांच्या उपस्थितीत संपन्न झाला. मा. उद्धवजी ठाकरे यांनी भाजपा व एकनाथ शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार यांच्या सरकारवर आरोप करून शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे व बेरोजगारांचे प्रश्न उपस्थित केले. आगामी लोकसभा निवडणुकीत अशा अन्यायी सरकारला व गद्दारांना पुन्हा निवडून देऊ नका असे आवाहन उपस्थित मतदारांना व कार्यकर्त्यांना केले. अद्याप जागा वाटप पूर्णपणे झाले नसून दोन दिवसात होणार असल्याचे सुतोवाच केले यावरून हिंगोली लोकसभा मतदार संघात व यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघात अद्याप महाविकास आघाडीचा उमेदवार ठरणे बाकी असल्याचे लक्षात येते.

 शिवसेना मा. उद्धव ठाकरे यांची मुलुख मैदानी तोफ मा. संजय राऊत यांनी देखील सत्ताधाऱ्यांवर आपली तोफ डागून भरपूर समाचार घेतला. माजी मंत्री संजय देशमुख, माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, प्राचार्य मोहन मोरे यांनीही आपल्या भाषणातून सत्ताधार्यावर हल्ला चढविला. उमरखेड येथे मागील दोन वर्षापासून छ. शिवाजी महाराजांचा पुतळा आणून बंदिस्त ठेवला असताना  अद्याप महाराजांचा पुतळा येथील नगर परिषदेला उभारता आला नाही असे यांचे सरकार आहे असा सत्ताधाऱ्यांचा खरपूस समाचार विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या जाहीर भाषणात घेतला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महाराजांच्या बंदिस्त पुतळ्याची दखल घेतल्यामुळे उमरखेड नगर प्रशासनाचे मुख्याधिकारी तथा प्रशासक महेश जामनोर यांनी महाराजांचा पुतळा तात्काळ उभा करण्याच्या हालचाली सुरू कराव्यात अशा शिवभक्तांच्या अपेक्षा आहेत.