अनिल जाधव : मालेगांव प्रतिनिधि
आज महाप्रसादाचे आयोजन मालेगाव ता. प्र. तालुक्यातील चिवरा येथे 8 मार्च रोजी महाशिवरात्रीनिमित्त तळ्यातील महादेव संस्थान येथे आयोजित कार्यक्रमात भाजपचे युवा नेते अॅड्. नकुल देशमुख यांचा जंगी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन पांडूरंग मुठाळ व मदन मुठाळ यांच्या वतीने करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड्.नकुल देशमुख हे होते. तसेच यावेळी माजी जि. प.सदस्य अशोकराव गवळी, मालेगाव खरेदी विक्रीचे उपाध्यक्ष सुभाषराव देवळे, अकोला सहकारी बोर्डाचे संचालक प्रकाश पाटील कुटे, सामाजिक कार्यकर्ते अनिल जाधव, अशोकराव सरनाईक यांची प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थिती होती. यावेळी आयोजकांच्या वतीने अॅड्.नकुल देशमुख यांच्यासह इतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना अॅड्. नकुल देशमुख यांनी गावकर्यांच्या मागणीनुसार चिवरा येथे सभागृह देण्याचे तसेच झोडगा बु.ते चिवरा रस्त्याचे काम लवकरच मार्गी लावणार असल्याचे सांगितले. तसेच चिवरा येथील विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही यावेळी अॅड्. देशमुख यांनी दिले. यावेळी महाशिवरात्रीनिमित्त आयोजित फराळाचे वाटप करण्यात आले. तसेच 9 मार्च रोजी आयोजित महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते वसंतराव क्षीरसागर यांनी कार्यक्रमाचे संचालन करून आभार मानले. 9 मार्च रोजी पांडूरंग मुठाळ यांच्याकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून या महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक पांडूरंग मुठाळ यांनी केले आहे. या कार्यक्रमाला रामप्रसाद क्षीरसागर, बबन सरकटे, अशोक मुठाळ, काशीनाथ मुठाळ, राजाराम मुठाळ, तान्हाजी मुठाळ, विठ्ठल मुठाळ, जयराम मुठाळ, विश्वंभर मुठाळ यांच्यासह उंडाळ व मुठाळ, वृद्ध, युवक आणि महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.





Social Plugin