मालेगाव बाह्य विधानसभा लढवण्या साठी भारत राष्ट्र समिती पक्षाने श्री प्रवीण ठोके राजपूत यांना हिरवा कंदील दाखवताच राजपूत समाजाने श्री राष्ट्रीय राजपूत करनी सेना मालेगाव तालुका अध्यक्ष पदाचा पदभार सुद्धा श्री प्रवीण आनंदा ठोके राजपूत यांना श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. अँड.शीलाताई सुखदेवसिंग गोगामेडी व राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री आनंद सिंग ठोके राजपूत यांच्या द्वारा पदभार देण्यात आला जेणेकरून येणाऱ्या काळात विधानसभेत येणाऱ्या अडीअडचणीला समाज व करणी सेना खंबीरपणे एक माजी सैनिक व समाज सेवकास मदत करण्यासाठी तयार राहील
मुलाखतीत श्री प्रवीण ठोके राजपूत यांनी सांगितलं कि गोर गरीब जनता व आजी माजी सैनिक यांच्या अडचणी सोडवणे व समाजकार्य करणे या ध्येयाने वाटचाल करणार आहे, यात मात्र मी कोणाचा विरोधक नसून फक्त ज्याप्रमाणे बावीस वर्षे देशाची सेवा केली त्याचप्रमाणे मी निस्वार्थपणे गोरगरीब जनता आजी-माजी सैनिक व त्यांच्या परिवार यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे, परंतु कोणी जर विरोधक समजून अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर मी एक सैनिक या नात्याने शूरवीर प्रमाणे जवाब देण्यास सुद्धा तयार राहील आणि मला असे वाटते की मी एक सर्वसाधारण परिवारातील माजी सैनिक असून कोणाला विरोधक म्हणून खटकणार नाही .
अध्यक्ष नाशिक विभाग त्रिदल सैनिक संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नाशिक विभाग भारत राष्ट्र समिती सैनिक आघाडीउपाध्यक्ष आणि करप्शन बोर्ड महाराष्ट्र राज्य या समिती व संघटना मध्ये कार्यरत आहे श्री प्रवीण ठोके राजपूत यांना पुढील वाटचाली साठी समस्थ आजी माजी सैनिक परिवार आणि करणी सेनेच्या राष्ट्रीय टीमच्या पधादिकारी यांनी शुभेच्छा दिल्या





Social Plugin