अंबड प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंके
कासार शिरसी जिल्हा लातूर येथील नवोदित तरुण पत्रकार चंद्रशेखर मधुकर केंगार यांनी त्यांना कोरोची तालुका हातकलंगणे जिल्हा कोल्हापूर येथे रविवार तारीख 10 रोजी आदर्श व निर्भीड पत्रकारिते साठी कासार शिरसी येथील जेष्ठ पत्रकार शाम मुळजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पदवीधर संघाचे माजी आमदार भगवानराव साळुंखे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले त्यांना देण्यात आलेला पुरस्कार त्यांनी या क्षेत्रातील त्यांचे मार्गदर्शक तथा गुरु जेष्ठ पत्रकार श्याम पंडितराव मुळजकर यांना समर्पित केला त्यांच्या या भावनेचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे
कासार शिरसी येथील तरुण पत्रकार चंद्रशेखर केंगार यांना कैलासवासी कृष्णाबाई चुडाप्पा पाटील फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या आठव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना संस्थांना आदर्शवत पुरस्काराने गौरवले जात असते त्या अनुषंगाने मराठवाड्यातील लातूर जिल्ह्याचे पत्रकार चंद्रशेखर केंगार यांना रविवार तारीख 10 रोजी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करोची तालुका हातकलंगणे येथे सन्मानित करण्यात आले त्यांना मिळालेला पुरस्कार त्यांनी समारंभ पूर्वक त्याच दिवशी त्यांचे या क्षेत्रातले मार्गदर्शक तथा मानस गुरु शाम मुळजकर यांना श्रद्धापूर्वक समर्पित केला याप्रसंगी फाउंडेशनच्या वतीने श्री केंगार यांना पत्रकारितेतून देश बलवान व्हावा त्यासाठी आपल्या हातून या क्षेत्रात यथार्थ कार्य पार पडावे ही अपेक्षा व्यक्त करण्यात आली
याप्रसंगी मुळजकर म्हणाले की समाजातल्या प्रत्येक तरुण पत्रकारांनी पत्रकारिता हे उपजीविकेचे साधन न मानता निस्वार्थपणे जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले या न्यायाने पत्रकारीता हे वृत समजून समाजाचे यथार्थ समर्थन करण्याचे त्यांनी आवाहन केले या समारंभास मोठा जनसमुदाय हजर होता





Social Plugin