Ticker

6/recent/ticker-posts

धामणगाव शिवारातून नवीन छोटा ट्रक्टर गेला चोरीला.

वसमत- धामणगाव येथील संजय उत्तमराव हरबळे या शेतकऱ्याचा छोटा ट्रक्टर चोरीला गेल्याची घटना घडली आहे. त्यांच्या शेतातील राहत्या घराजवळून दिनांक १९ मार्च २०२४, मंगळवार रोजी रात्री १ ते २ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी ट्रक्टर चोराला आहे. दीड महिन्यापूर्वी नवीनच घेतलेला ट्रक्टर चोरीला जाण्याची धामणगाव शिवारातील ही पहिलीच घटना आहे. संजय हरबळे व त्यांचे कुटुंबीय धामणगाव शिवारातील औंढा-वसमत रोड च्या कडेला त्यांच्या शेतामध्ये गेल्या अनेक वर्षापासून राहतात. 

हरबळे आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी थोडीफार असलेली शेती करून त्याला जोडधंदा म्हणून ट्रक्टर चा व्यवसाय करतात. आर्थिक परिस्थिती हलाखीची असतांना बँकेचे कर्ज काढून त्यांनी दीड महिन्यापूर्वी नवीन ट्रक्टर घेतला होता, पण आता तो चोरीला गेल्यामुळे त्यांच्या त्यांच्यावर दुहेरी संकट ओढवले आहे. या घटनेची तक्रार कुरुंदा पोलीस स्टेशन ला देवून सखोल तपास करण्याची विनंती संजय हरबळे व गावकऱ्यांनी केली आहे.