Ticker

6/recent/ticker-posts

आडगावला ई बसेस चार्जिंग स्टेशन उभारण्याची प्रक्रिया सुरू



कीर्तीराज घुगे (प्रतिनिधी)

आडगाव येथे येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर महानगर पालिकेकडून १०० बससेसाठी डेपो तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात पीएम-ई बसेस धावणार असल्याचे बोलले जात होते. त्यानुसार आता शहरात आडगाव येथे डेपो तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.शंभर बस डेपोसाठी २७.४७ कोटींचा खर्च येणार आहे.

पीएम ई बस योजने अंतर्गत महापालिकेला शंभर इलेक्ट्रिक बसेस पुरवठ्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ५ डिसेंबर २०२३ रोजी केंद्र सरकारने याला मंजुरी दिल्यानंतर महानगर पालिकेला पहिल्या टप्प्यात ५० बसेस मिळणार आहे. त्यामुळे या बसेसच्या संचालनासाठी तयारी सुरू केली आहे. 

शहरात सध्या २०० सीएनजी, तर ५० डिझेल अशा एकूण २५० बसेस विविध मार्गांवर चालविल्या जातात. प्रदूषण कमी करण्याच्या निर्णयानुसार आता सिटीलिंकच्या ताफ्यात ५० इलेक्ट्रिक बस समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे आडगावला ई बसेस चार्जिंग स्टेशन उभारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.