पाटण (दिनकर वाईकर)
मराठा आरक्षणावर गेले अनेक दिवस मनोज जरांगे पाटील आंदोलन करित आहेत त्याला मराठा समाजाकडुन भरघोस प्रतिसाद मिळला आहे .या निवडनुकित मराठा आंदोलनाचा प्रभाव दिसुन येईल असे चित्र संपूर्ण महाराष्ट्रात दिसत आहे .याच पार्श्वभूमीवर संपुर्ण महाराष्ट्रात मराठा समाजातील अंदोलनकर्त्यांच्यातुन सरकार बद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे आणी याच मुळे संपुर्ण महाराष्ट्रात लोकसभा निवडनुकित प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाजाचे मराठा आरक्षणातील काही मंडळीनी लोकसभा निवडनुक लढविणार असल्याचे सांगितले आहे.यामुळे सातारा जिल्ह्यातील अनेक मराठा समाजातील तरूणांनी लोकसभा निवडनुक लढणार असल्याचे संकेत दिले आहे.याच पार्श्वभूमीवर पाटण तालुक्यातुनही ठोमसे गावचे सुपुत्र मराठा मोर्चाचे कार्यकर्ते व तरुणांचे आयडाॅल गणेशराव रमेश माने हे सातारा लोकसभा मतदार संघातुन लोकसभा निवडनुक लढविणार आहेत.
गणेशराव रमेश माने उच्च शिक्षित असुन ते युवा उद्योजक आहेत ते सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातिल ठोमसे गावचे सुपुत्र आहेत .गावच्या सामाजिक धार्मिक कार्यात ते नेहमी अग्रेसर असतात कराड आणी पाटण तालुक्यातुनही अनेक मराठा समाजाचे अंदोलक लोकसभेसाठी अर्ज भरणार असल्याचीही माहिती मराठा समन्वयकांडुन दिली जात आहे .लवकरच गणेशराव माने हे अंतरवाली सराटी येथे जाऊन मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेणार आहेत आणि काहिही झाले तरी मी सातारा लोकसभा लढविणार असल्याचेही श्री गणेशराव रमेश माने यानी सांगितले.





Social Plugin