अमरावती, सोनल रंगारी
सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024 अंतर्गत 07-अमरावती (अ.जा.) लोकसभा मतदारसंघात आज एका उमेदवाराकडून चार नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यात आली. उमेदवाराचे नाव -राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार बळवंत बसवंत वानखडे. श्री. वानखडे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात 4 नामांकन अर्ज दाखल केले. आज 07 -अमरावती लोकसभा मतदारसंघात 75 नामनिर्देशन पत्र विक्री झाले आहेत.
4 एप्रिल ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल तर 5 एप्रिल रोजी उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. 8 एप्रिल ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. शुक्रवार दि. 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर मंगळवार दि. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. आदर्श आचारसंहिता गुरुवार दि. 6 जून पर्यंत लागू राहणार आहे.





Social Plugin