Ticker

6/recent/ticker-posts

लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या आनंदो प्लस प्रकल्पाच्या वतीने वाटुर येथे आरोग्य शिबिर संपन्न


कैलास कोल्हे @ ग्रामीण प्रतिनिधी मंठा 

दिनांक - 16-03-2024 रोजी लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट आनंदो प्लस प्रकल्पाच्या टास्कफोर्स टीमच्या वतीने आणि बागेश्वरी सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वाटूर गावात मोफत नेत्र तपासणी आणि मानसिक आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी आनंदो प्रकल्पाचे सेंटर एक्झिक्येटीव्ह श्री अमोल गोडगे सर यांनी सूत्रसंचालन केले.  

त्याचप्रमाणे या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी वाटूर गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. आनंदो प्लस प्रकल्पाचे सहाय्यक समन्वयक श्री प्रवीण धाड यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून वाटूर गावातील 130 महिला आणि पुरुषांनी या शिबिराचा लाभ घेतला या शिबिरासाठी संवेदना केंद्र मानसिक आरोग्य तज्ञ म्हणून ग्रामीण रुग्णालय वाटूर येथील श्री काळदाते सर व नेत्रचिकित्सक श्री पाटील सर व सौ. पाटील मॅडम यांनी सेवा दिली. लाईट ऑफ लाईफ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकल्प राबवले जात आहे. 

 या संस्थेच्या वेगवेगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून खुप चांगल्या प्रकारचे काम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांन साठी चालू आहे. मुलांचा सर्वागिण विकास व्हावा या साठी 2008 पासुन जालना जिल्ह्यात मंठा, जालना, बदनापुर व परतूर या ठिकाणी काम करते आहे. या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना साठी ही मोठ्या प्रमाणात वेगवेगळे कार्यक्रम आयोजन केले जातात.  या आरोग्य शिबिरात मोठ्या प्रमाणात विद्यार्थीनी लाभ घेतला. आरोग्य शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी टास्क फोर्स टीम, योगेश सुरसे, सोमनाथ काळे, सोपान माने, अनिकेत डोने, रूपाली कृष्णा माने, रूपाली प्रल्हाद माने, मयुरी वायाळ, अश्विनी पाटोळे, अपर्णा माने यांनी अथक परिश्रम घेतले. त्यानंतर आनंद प्लस प्रकल्पाचे सहाय्यक समन्वयक श्री प्रवीण धाड यांनी सर्व उपस्थित आमचे आभार मानले.