पाथर्डी प्रतिनिधी:
तालुक्यातील सुसरे येथे आयोजित करण्यात आलेल्या श्री पांडुरंग अखंड हरिनाम सप्ताह गाथा पारायण सोहळा धार्मिक वातावरणात उत्साहात पार पडला. ह.भ.प राम महाराज झिंजुर्के यांच्या काल्याच्या किर्तनाने या सप्ताहाचा समारोप झाला.सकाळी गावात टाळ, मृदुंगाच्या गजरात तर विठ्ठल नामाच्या जयघोषात दिंडी प्रदक्षिणा मिरवणूक काढण्यात आली.यामध्ये महिला डोक्यावर तुलसी कलश घेऊन उस्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या. झिंजुर्के महाराजांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली . यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काल्याच्या किर्तनात झिंजुर्के महाराजांनी याप्रसंगी खडकी सोडीयेल्या मोटा ,आजिचा दहिकाला गोमटा , घ्यारे घ्यारे दहिभात आम्हा देतो पंढरीनाथ हा अभंग सोडवला. गावकऱ्यांच्या सहकार्याने सप्ताह उत्साहात संपन्न झाला. सप्ताहात पहाटे काकडा भजन, विष्णू सहस्त्रनाम, श्री गाथा पारायण सोहळा प्रवचन व रात्री कीर्तन, असे धार्मिक कार्यक्रम झाले. श्रीराम शेठ यांच्या हस्ते सप्ताहात विणा पहारा देणाऱ्या मुलांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते. सप्ताह यशस्वी करण्यासाठी विठ्ठल महाराज घुले भक्ती केंद्रातील तरुण वर्ग, ग्रामस्थ , सप्ताह कमिटी यांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी गायनाचार्य, मृदुंगाचार्य ,भाविक भक्त व महिला भगीनी उपस्थित होत्या.





Social Plugin