कारंजा प्रतिनिधी गुणवंत राठोड
वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघ महायुतीच्या उमेदवार सौ राजश्रीताई पाटील यांच् या प्रचारार्थ मा.मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या जाहीर सभेचे आयोजन दिनांक-२० एप्रिल रोजी जिल्हा परिषद मैदान मंगरूळपीर येथे करण्यात आले,त्यानिमित्ताने उपस्थित मा.मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांना कारंजा शहरातील विविध समस्या व स्थानिक विकास कार्यासाठी निवेदन देण्यात आले,
त्यावर मा.मुख्यमंत्री साहेब यांनी सर्व मागण्या लवकरच मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगून कारंजा येथील एमआयडीसीची मागणी पूर्ण झाली असून कारंजा येथील शेतकऱ्यांसाठी व्हेजिटेबल हब व ट्रान्सपोर्ट नगरची मागणी सुद्धा पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी मा. खासदार भावनाताई गवळी,मा.पालकमंत्री श्री संजय राठोड,मा.आमदार श्री इंद्रनील नाईक,राकापा वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मो युसुफ पुंजानी, कृउबा सभापती सईताई डहाके,माजी नगराध्यक्ष श्री दत्तराज डहाके,श्री देवव्रत डहाके यांचे सह सर्व नगरसेवक, कृउबा संचालक,खविस पदाधिकारी, पस पदाधिकारी,ग्राप सरपंच व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा,तालुका व शहर पदाधिकारी तथा बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.





Social Plugin