Ticker

6/recent/ticker-posts

मोरगाव भाकरे येथे गेल्या एक ते दीड महिन्यापासून सामन्य जनता पिण्याचा पाण्या पासून वंचित.


प्रतिनिधी: पंकज सिरसाट. 

        मोरगाव भाकरे येथील वार्ड क्र.१ गेले एक ते दीड महिन्यापासून सामन्य जनता पिण्याचा पाण्या पासून वंचित राहत आहे. या बातमीद्वारे, स्थानिक क्षेत्रातील सामान्य लोकांच्या तक्रारीवर लक्ष केंद्रित करायचा आहे. तसेच गावामध्ये वारी हनुमानाचे पाईप लाईन चे खोदकाम करण्यात आले असून या कामामुळे चांगल्या रस्त्याची आज खूप दयनीय दुर्दशा झाली आहे, तसेच या खोद्कामुळे जेष्ठ वर्गाचे चे खूप हाल होत आहेत, तसेच जागोजागी जुने पाईप लाईन पूर्णता खराब तसेच लीकीज झाली असून वार्ड क्र.१ मध्ये एक ते दीड महिन्यापासून पिण्याचे पाणी येत नाही, यामुळे सामन्य जनतेचे खूप प्रमाणात हाल होत आहेत. हे सर्व ग्रामपंचायतीच्या चुकीच्या आणि लापरवाही कार्यप्रणाली मुळे झालं आहे. त्याच प्रमाणे ग्रामपंचायत चे पाणीपुरवठा कर्मचारी चा मनमानी कारभार करीत आहेत. अशा वारंवार तक्रारी गावकरी करीत आहेत. कृपया करून गावातील सरपंच तसेच सचिव यांनी याकडे लक्ष द्यावे.