Ticker

6/recent/ticker-posts

आंबेवाडी प्रकल्प धारक शेतकऱ्यांना पाण्याच्या टाक्या वाटप

ग्रामीण प्रतिनिधी शंकर निंबारे देवडोंगरी

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागातील बहुतांश शेतकऱ्यांनी शेतीला जोडशेती म्हणून कृषी विभागाकडून तसेच सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सुधारीत कलम आंबा फळबाग लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. 

   या फळबाग आंबेवाडी प्रकल्पातील अंबेच्या लहान रोपांना आवश्यकतेनुसार उन्हाळ्यात पाणी नसल्याने आंबेवाडी प्रकल्प फळ रोपे करपुन पाण्याअभावी शेतकऱ्यांची मोठी नुकसान होण्यापासून नाकारता येणार नाही. हि समस्या जाणून घेऊन श्री गुरुजी रुग्णालय, आंनंदवल्ली, नाशिक, सेवा संकल्प समिती व रंभा फिलॅथ्रोपी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत देवडोंगरा येथील २३ शेतकऱ्यांना आणि ग्रामपंचायत देवडोंगरी पैकी बोरमाळ येथील ३ शेतकऱ्यांना पन्नास टक्के शेतकरी हिस्सा भरून एक हजार लिटरची पाण्याची टाक्या देण्यात आल्या आहेत. तसेच आंबेवाडी प्रकल्प धारक लाभार्थ्यांना शेतकरी हिस्सा भरून ठिबक सिंचन हि देण्यात आली आहेत. उर्वरित शेतकऱ्यांना आंबेवाडी प्रकल्प लाभार्थ्यांना येत्या आठवड्यात पाण्याच्या टाक्या वाटप करण्यात येणार आहेत. अशी सेवा संकल्प समिती घ्या कार्यकर्त्यांकडून माहिती समजली आहे.

    पाण्याची टाकी तसेच ठिबक सिंचन मिळाल्याने डोक्यावर पाणी पुरवठा करण्याचा शेतकऱ्यांचा वेळ वाचला तसेच ठिबक सिंचनाने मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होत आहे. यामुळे श्री गुरुजी रुग्णालय नाशिक, सेवा संकल्प समिती व रंभा फिलॅथ्रोपी फाऊंडेशन चे शेतकरी बांधवांकडून कौतुक व आभार व्यक्त होताना दिसुन आले.