प्रतिनिधि : कृष्णा महाले उल्हासनगर
दरवषी प्रमाणे उमप स्थायी समिती सभापती विजय पाटील यांच्या वतीने उल्हासनगर पाच येथील कार्यालय येथे तान्हाजी नगर नेहरू नगर दुर्गा पाढा अंबरनाथ एकत्र ईप्तार पार्टी चे आयोजन करण्यात आले मुस्लीम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरू असून, उपवास सोडण्यासाठी नुकतेच रोजा इफ्तारचे आयोजन करण्यात आले होते. रोजा इफ्तार पार्टी मोठ्या उत्साहात पार पाडली. सामाजिक सलोखा राखण्यात इफ्तार पार्टीची मोठी मदत होत असल्याचे मत विजू चाहू पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी या कार्यक्रमास शुभेच्छा देताना ते म्हणाले की, सामाजिक सलोखा आणि एकात्मतेसाठी सर्व समाजातील लोक एकत्र येणे आवश्यक आहे. सर्व धर्मांमध्ये समानतेची जाणीव निर्माण करून आपापसांतील बंधुभाव वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सामाजिक सलोखा राखण्यात इफ्तार पार्टीची मोठी मदत होत असून त्यामुळे विचारांची देवाणघेवाण होते. आपण सर्व एक आहोत ही भावना वृद्धिंगत होण्यासाठी रोजा इफ्तार पार्टी महत्त्वाची आहे
उमपा स्थायी समिती सभापती विजय पाटील,समाजसेवक रवि पाटील, युवासेना कल्याण उपजिल्हा अधिकारी युवराज पाटील, रुद्राराज पाटील, समाजसेवक कार्यकर्ते आणि उत्तर भारतीय लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते





Social Plugin