Ticker

6/recent/ticker-posts

रामोशी समाजबांधवांनी भाजपाच्या पाठीशी राहावे- स्वाभिमानी रामोशी महासंघाच्या राज्य अध्यक्ष सौ प्रियाताई नाईक यांचे आवाहन


 मतदार संघात गावोगावी छ. उदयनराजे यांच्यासाठी होम टू होम जोरदार प्रचारमोहीम                           

बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ] :  

भारतीय जनता पक्षाने रामोशी समाजासाठी विविध स्वरूपात सहकार्य केले आहे. या पार्श्वभूमीवर सर्व समाजबांधवांनी कमळ चिन्हासमोरील बटन दाबून श्री. छ. उदयनराजे भोसले यांना विजयी करावे, असे आवाहन स्वाभिमानी रामोशी महासंघाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सौ प्रियाताई नाईक यांनी केले आहे.      सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या निवडणूक प्रचारार्थ गावोगावी मतदारांशी संवाद साधताना त्यांनी  व्यक्त केली आहे.    खटाव तालुक्यातील विसापूर, पुसेगाव या प्रमुख गावांसह अन्य गावोगावी रामोशी समाज बांधवांसह अन्य प्रवर्गातील मतदारांशीही त्यांनी प्रचार मोहीम यशस्वी करत आणली आहे. समाज बांधवांच्या वस्तीवर, अन्य नागरिकांच्याही शेत शिवारात आणि घरोघरी पोहोचून सौ. प्रियाताई नाईक भाजपाला मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. मतदारांशी सुसंवाद साधताना आणि प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या पत्रकातील माहितीनुसार आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची शासकीय स्तरावर जयंती साजरी होण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जीआर काढला तसेच रामोशी समाजाच्या उन्नतीसाठी आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून प्रत्यक्षात निधी उपलब्ध करून दिला आहे. त्या माध्यमातून समाजातील होतकरू युवकांना आणि व्यावसायिकांना प्रगतीचा मार्ग खुला झाला आहे. त्यामुळे भाजपाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी कमळ या चिन्हाच्या पाठीशी राहावे, असे आवाहनही सौ. प्रियाताई नाईक यांनी प्रचारादरम्यान केले आहे. 

 भारतीय जनता पक्षाचे नेते व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीच्या विचारातून रामोशी समाज बांधवांसह सर्वच समाजाचा आणि समाजातील विविध घटकांचा विकास होऊ लागला आहे. ही परंपरा पुढे नेण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांनाच पाठबळ देणे गरजेचे आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवरायांचे थेट तेरावे वंशज आहेत. त्यांच्या माध्यमातून आजवर मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकास झाला आहे. तसेच त्यांच्यासारखा विकासाभिमुख लोकप्रतिनिधी संसदेत पाठवण्याने समाजाच्या सर्व स्तरातील घटकांना न्याय मिळवणार असल्याने त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन ही सौ प्रिया नाईक यांनी ठिकठिकाणच्या गाव भेटीमध्ये मतदारांना केले आहे. भारतीय जनता पक्षाचे शिस्तबद्ध व विकासात्मक धोरण, नरेंद्र मोदी यांचे कणखर नेतृत्व आणि सातारा मतदारसंघातील श्री. छ. उदयनराजे भोसले यांची उमेदवारी या सर्व बेरजेच्या बाबी लक्षात घेता सातारा मतदारसंघात निश्चितच कमळ चिन्हाचा विजय होईल याची खात्री आहे. मतदारांचा मिळणारा प्रतिसाद पाहता मोठ्या मताधिक्याने उदयनराजे भोसले निवडून येतील अशी प्रतिक्रियाही सौ. नाईक यांनी व्यक्त केली आहे.