कीर्तीराज घुगे (प्रतिनिधी)
नाशिक - भक्त श्रीराम हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यासाठी सर्वच चैतन्य निर्माण झाले आहे. शहरातील हनुमान मंदिरांना हनुमान जन्मोत्सवानिमीत्त रोषणाई तसेच फुलांची सजावट करण्यात आली आहे. तसेच महाआरती हनुमान चालिसा, हनुमान बीजमंत्र पठण, महाप्रसाद वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. नाशिक शहरातील विविध हनुमान मंदिरांत हनुमान जयंतीनिमीत फुलांची आरास, आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.
नाशिककरांसाठी दुतोंड्या मारुती हा गोदवरीच्या पुराचा अंदाज दर्शवतो. गोदवरीच्या किनारी असलेली दुतोंड्या मारुतीची मूर्ती पर्यटकांसह नाशिककरांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. या ठिकाणी हनुमान जयंतीच्यानिमित्ताने दर्शनासाठी गर्दी होणार आहे. सराफ बाजारातील नवसाला पावणारा दक्षिणमुखी सोन्या मारुती मंदिरात आज दि. २३ रोजी सकाळी सहाला हनुमान जन्मसोहळा होणार आहे.
दोन लाख भाविकांतर्फे हनुमान चालिसा पठण श्रीक्षेत्र अंजनेरी येथे मंगळवारी (दि. २३ रोजी) हनुमान जन्मोत्सवानिमित्त आयोजन केले असून, उत्सवात दोन लाख भाविक हनुमान चालिसा पठण करणार आहेत. यावेळी विश्वविक्रमी महाआरती होणार आहे. अंजनेरी येथे ध्वजारोहण, पहाटे पाचपासून साधू-महंतांच्या हस्ते महायज्ञ, सकाळी पावणेदहाला भाविकांच्या उपस्थितीत महाआरती, हनुमान बीजमंत्र पठण, साधू-महंतांना भगवे वस्त्रदान, भक्तांसाठी ५ लाख लाडूंचा प्रसाद वाटण्यात येणार आहे.





Social Plugin