बाळाभाऊ सानप प्रतिनिधी
आज हनुमान जयंती, हिंदू सणांपैकी एक महत्त्वाचा सण, आज खळेगाव येथे सर्व गावकरी मंडळींनी हनुमान जयंतीच्या कार्यक्रमाचे नियोजन केले त्यामध्ये भव्य अशी आरती, श्रीमद् भागवत कथा, यज्ञ सोहळा व तसेच भोजन असे कार्यक्रम होते त्यासाठी सर्व गावकरी मंडळींनी व तसेच सर्व नवयुवक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आरती केली, या गावांमध्ये मागील सात दिवसापासून सप्ताहाचे नियोजन करण्यात आले होते, याकरिता सात दिवस भोजन, श्रीमद् भागवत कथा व तसेच कीर्तन असे नियोजन होते त्यासाठी सर्व गावकरी मंडळींनी एकमेकांना सहकार्य करून ते कार्यक्रम पार पाडले व आज कार्यक्रमाची समाप्ती तसेच हनुमान जन्मोत्सव एकाच वेळी साजरा करण्यात आला यासाठी जसे गावकरी मंडळींनी सात दिवस सहकार्य केले तसेच हनुमान जयंतीला सुद्धा सर्वांनी एकजुटीने येऊन आरतीचा आनंद घेतला हनुमान महाराजांची पूजा केली, तसेच फटाके फोडून हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. आणि कार्यक्रम पार पडला..





Social Plugin