Ticker

6/recent/ticker-posts

प्रशासन निवडणुकीच्या कामात व्यस्त अवैध वाळू उपसा मात्र मस्त



 प्रतिनिधी पोपट पवार सावखेडग॑गा

    वैजापूर तालुक्यातील बाभुळगाव ग॑गा शिवारातुन रात्री व दिवसा उन्हाचा फायदा घेत टॉक्टरच्या सहाय्याने वाळू उपसा बिनधास्त चालू आहे हे गाव विरगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत येते परंतु मागिल आठवड्यात वैजापूरचे तहसीलदार सुनील सावंत यांनी विरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत अव्वल गाव येथे दु चांदीचा पॅटर्न वापरून रात्री कारवाई केली मात्र सध्या बाभुळगाव ग॑गा शिवारातुन बेवडा पॅई॑डवरुन बिनधास्त अवैध वाळू उपसा सुरु आहे 

    सध्या शेती व पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे तरी पाण्याचा स्रोत म्हणून गोदावरी नदीकडे बघीतले जाते परंतु नदीमध्ये वाळु मुळे पाणी टिकून राहते परंतु सध्या वाळू उपसा बेसुमार चालू असल्याने नदीचे लाचके तोंडाने दिसतात तरी पोलिस प्रशासनाने रात्री पॅट्रोलि॑ग सुरू करून प्रशासननाचा होणार तोटा थांबवावा परंतु काही पोलिस कर्मचारीच्या या सर्व गोष्टी मध्ये हात असल्याचे स्थानिक पातळीवर चर्चा सुरू आहे वरीष्ठानी या सर्व गोष्टीवर लक्ष घालावे अशी आशा नागरिकांना आहे