Ticker

6/recent/ticker-posts

गुन्ह्यांचा यशस्वी तपास केल्याबद्दल चाळीसगाव शहर पोलीसांचा पोलीस अधीक्षकांकडून गौरव


प्रतिनिधी दिपक गुरव चाळीसगाव

चाळीसगाव बैंक अपहाराच्या गुन्ह्यातील रक्कम हस्तगत करण्यासह चोरीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करून आरोपींना २४ तासाच्या आत अटक करून यशस्वी कामगिरी करणारे तसेच हरवेलल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या कुटुंबियांच्या हवाली सुरक्षितरीत्या पोहचवले म्हणून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या अधिकान्यांसह कर्मचाऱ्यांचा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते शुक्रवारी प्रशस्तीपत्रक देवून गौरवण्यात आले.

चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यातील बँक अपहाराच्या गुन्ह्यातील रक्कम तसेच चोरीच्या गुन्ह्यातील मुद्देमार रिकव्हर करून आरोपींना २४ तासाच्या आत अटक करून गुन्ह्याचा यशस्वी तपास केल्याबद्दल चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, चालक हवालदार नितीन वाल्हे, हवालदार अजय पाटील, पोना. दीपक पाटील, पोकॉ. नंदकिशोर महाजन यांना पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते शुक्रवारी जळगाव येथे प्रशस्तीपत्रक देवून गौरवण्यात आले.

 हवालदार प्रशांत पाटील जीस्त हरविलेल्या व्यक्तींच्या (मिसिंग गुन्हा) तपास करून शोध घेऊन त्यांना त्यांच्या कुटुंबियांच्या हवाली सुरक्षितरित्या ताब्यात दिले म्हणून शहर पोलीस स्टेशनचे हवालदार प्रशांत पाटील यांनाही पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देवून गौरवण्यात आले. विविध गुन्ह्यांमध्ये यशस्वी तपास करून पोलीस ठाण्याची मान उंचावल्याबद्दल पोलीस अधीक्षकांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना गौरवल्याने या अधिकारी व कर्मचान्यांचे यांचाही गौरव तसेच नाशिक परिक्षेत्रात सर्वात अभिनंदन होत आहे.