Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा

प्रतिनिधी .सचिन ठुले :-एरंडेश्वर  

वादळी वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसामुळे मोठमोठी झाडे कोसळली . विज वाहण्या तुटल्या व फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे .  पुर्णा.-तालुक्यातील  एरंडेश्वर. कात्नेश्वर. नावकी.नांदगाव  आहेरवाडी  अनेक गावाला आज दि 17 -4 -2024 रोजी सायंकाळी सहा.सात च्या सुमारास  अचानक वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसामुळे घरावरील टिन.पत्रे ऊडाली त्यामुळे  अनेक ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले आहे  तर दुसरी कडे ‌शेतकर्यांचे आंबा कांदा .टरबूज  पपई  पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे व विद्युत खांबे देखील कोसळली आहे  त्यामुळे अनेक भागातील विज पुरवठा खंडित झाला आहे  .