पाटण ( दिनकर वाईकर)
सातारा हा यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा जिल्हा आहे महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब जो निर्णय घेतील तो मान्य असेल सातारा लोकसभा मतदारसंघातून यशवंत विचारांचा उमेदवार निवडून आणून असा विश्वास माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पाटण येथील महाविकास आघाडीच्या मेळाव्यात व्यक्त करून मोदी सरकारवर सडकून टीका केली.
या संवाद मेळाव्यास माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर , आ.बाळासाहेब पाटील ,युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर ,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने ,श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ भारत पाटणकर ,शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षद कदम ,राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव ,सरचिटणीस हिंदुराव पाटील ,नरेश देसाई, शेतकरी संघटनेचे नेते शंकरराव गोडसे ,भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष आबासाहेब भोळे ,अजित पाटील-चिखलीकर ,राजाभाऊ शेलार ,सुरेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती
यावेळी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले सरकारचे दबाव तंत्र मोठ्या प्रमाणात सुरू आहे काँग्रेस पक्षाला दंडाची नोटीस काढले आहे पक्षाचे उत्पन्न जेवढे नाही त्याहून अधिक दंड ठोठावला आहे पक्षाची बँक खाते गोठवली आहेत नरेंद्र मोदी यांचा आत्मविश्वास ढळलेला आहे. सण 2019 ला जे घडले ते आता घडणार नाही अच्छे दिन , 15 लाखाचे आमिष , उज्वला योजना हे बोलून लोकांना फसवले आणि बेरोजगारी महागाई डोक्यावर आणून ठेवली . देशावर 203 लाख कोटी कर्ज झाले आहे जगातील सर्वात भ्रष्टाचाराची प्रकरणे येथे घडत आहेत' पन्नास खोके द्या आणि आमदार विकत घ्या' हेच उद्दिष्ट दिसत आहे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला साथ देऊन हुकूमशाहीला आळा घालायचा आहे हे शेतकऱ्यांवर अन्याय करणारे सरकार आहे पुन्हा जर हे सरकार सत्तेत आले तर देशाची वाट लागेल संविधान पायदळी तुडवले जाईल देशात हुकूमशाही होईल आत्ताची निवडणूक कदाचित शेवटची ठरू शकते .आता शहाणी होऊन भाजप हटाव भूमिका घेतली पाहिजे .असेही आमदार चव्हाण म्हणाले
पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले की सरकारने राजकीय पक्षांमध्ये घराघरांमध्ये लोकांमध्ये फूट पाडण्याचे काम केले आहे गद्दार ,फितूर ,पाठीत सुरा खूपसणारे लोक महाराष्ट्राच्या राजकारणात चालत नाहीत .शरद पवार यांचा अंतिम निर्णय आपण शिरजोर मानला पाहिजे पवार साहेबांनी दिलेल्या उमेदवाराला आपण बहुमताने निवडून दिले पाहिजे
आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले की देशामध्ये भयंकर परिस्थिती आहे दबाव तंत्र दाखवून लोकांना पक्षांना राजकीय पदाधिकारी यांना आपलेसे केले जात आहे .लोकसभा हे मोठे आव्हान आहे निवडणुकीचे वातावरण अजून तापलेले नाही जिल्ह्यातील वातावरण पाहता शरदचंद्र पवार यांच्या निर्णयाला खंबीर साथ देण्यात येणार आहे .
डॉ भारत पाटणकर म्हणाले आम्ही इंडिया आघाडीच्या 17 उमेदवारांना पाठिंबा देणार आहोत देशात परिस्थिती विघातक आहे ब्राह्मण ,क्षत्रिय ,शूद्र ,वैश्य ही उतरंडी ठरवणारे सरकार गेल्या दहा वर्षात आम्ही पाहिले आत्ताचे सरकार जातीय व्यवस्थेवर चालणारे आहे देशाच्या मानगुटीवर सात जण बसले आहेत त्यामधील एकाने पाटण तालुक्यात देखील शिरकाव केला आहे .स्त्रियांवरती अन्याय अत्याचार होत आहेत हे सरकार मोदीचे सरकार नाही तर भांडवलदार ,जातीयवादी ,आर.एस.एस चे सरकार आहे
प्रारंभिक प्रास्तविकात विक्रमसिंह पाटणकर म्हणाले की समाजात गोंधळ घालण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत .ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे जाहिरातींचा भंपकपणा चालू आहे याला उत्तर दिले पाहिजे सर्वसामान्य लोक गोंधळून गेले आहेत. नको असलेले मुद्दे समाजात मांडण्याची कौशल्य काही लोकांकडे आहे. महागाई ,बेकारी, बेरोजगारी हे प्रश्न अडगळीत पडले आहेत .लोकांना भांबावून सोडणे हेच सत्ताधाऱ्यांचे काम सुरू आहे अशी टीका त्यांनी केली
सुनील माने म्हणाले की संविधानाला पायदळी तोडण्याची काम सुरू आहे सत्ता आणि शासकीय यंत्रणा यांच्या माध्यमातून लोकांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत सातारा मतदारसंघात स्थिती विदारक आहे .सरकार कोणत्याही गोष्टीला दात देत नाही. न्यायव्यवस्था चिंतेत आहे जिल्ह्यातील चित्र याहून वेगळे नाही लोकांनी एकत्रित येऊन आपला विधायक निर्णय मतांच्या माध्यमातून दाखवून द्यावा.
सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले की केंद्राचे जे प्रश्न आहेत तेच प्रश्न ग्रामीण स्तरावर आहेत ' सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता ' हीच परिस्थिती आहे संघर्ष आम्हाला नवीन नाही .येणाऱ्या सर्वच बातम्या खरे असतात असे नाही .आम्ही प्रसिद्धी कमी काम जास्त करत आहे .
हर्षद कदम म्हणाले की गद्दारांना धडा शिकवायला आज सगळे एकत्रित झाले आहेत. शिवसेनेच्या पाठीत खंजर खूपसणारा पहिला गद्दार या जिल्ह्यातील आहे. जी परिस्थिती देशात आहे तीच परिस्थिती जिल्ह्यात आहे .आपल्या इथे देखील एक ' बाल मोदी 'आहे आपल्या मनातील राग व्यक्त करण्याची हीच तर खरी सुरुवात आहे यावेळी
अजित पाटील ,आबासाहेब भोळे ,सचिन जाधव यांनीही भाषण केले मेळाव्याला तालुक्यातील महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Social Plugin