मारोती गाडगे/कटचिंचोली
गेवराई (बीड) :- पैठण तालुक्यातील मौजे खादगाव येथे दिनांक १९ रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. या जयंतीत भव्य मिरवणूक, प्रबोधनाचा कार्यक्रम, आणि भव्य असा भोजनदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा. अनिल गवळे यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले प्रा. मिलिंद ठोकळे सर यांनी संविधान संरक्षण आणि रक्षण करण्यासाठी तरुणांनी पुढे आले पाहिजे.
संविधान हा भारताचा मानबिंदू आहेत आणि तो सर्वांनी समजून आपल्या सर्वांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपले मूलभूत कर्तव्य यांचे जतन केले पाहिजे. यासाठी संघटित होऊन संविधान विरोधी शक्तींना रोखले पाहिजे असे प्रतिपादन केले. यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून गौतम वाकडे, डॉ.बडगे गौतम सोनवणे, पंकज गायकवाड, प्रभाकर ढोले, सुभाष नरवडे, कारभारी नरवडे, विजय दारकुंडे ,संजय चाबुकस्वार, गावातील सरपंच उपसरपंच व सर्वच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता.





Social Plugin