कोयना धरणातून सिंचनासाठी पाणी वाढवले . सिंचनासाठी प्रतिसेकंद ३ हजार ३०० क्युसेक्स विसर्ग .
पाटण ( दिनकर वाईकर )
सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी वाढल्यामुळे शनिवारी सकाळी कोयना धरणाच्या पायथ्याशी असलेल्या आपत्कालीन दरवाजा नदी विमोचकाद्वारे प्रतिसेकंद १२०० क्युसेक्स विसर्ग करण्यात आला असल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे .
कोयना धरण पायथा विद्युत गृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे २१०० व आपत्कालीन विमोचक दरवाजातून ९०० असा प्रतिसेकंद एकूण ३००० क्युसेक्स विसर्ग सुरू होता . शनिवारी यात वाढ करून कोयना नदीमध्ये आता एकूण ३३०० क्युसेक्स विसर्ग सोडण्यात येत आहे .धरणात सध्या एकूण ४२.९३ टीएमसी उपलब्ध तर उपयुक्त ३७.८१ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे .





Social Plugin