Ticker

6/recent/ticker-posts

स्वयंपूर्ण स्वावलंबी आमखेडा गावाची बिहारचे महामहीम राज्यपाल व पद्मश्री विजय भटकर सर यांच्या समोर मांडणी



संजय भरदुक प्रतिनिधी 

वाशिम जिल्हातील अतिदुर्गम भागात वसलेले आमखेडा या गावातील स्वयं पूर्ण गाव संकल्पनेची गीताई ह्युमनकाईंड डेव्हलपमेंट ट्रस्ट च्या वतीने परम या सुपर संगणकाचे जनक पद्मश्री विजय भटकर व बिहारचे महामहीम राज्यपाल मा.राजेंन्दजी अलैकर यांचे समोर मांडणी करून त्यांना या संकल्पनेची सविस्तर माहिती देण्यात आलीआमखेडा या गावात जोगदंड कुटुंबाच्या वतीने गीताई ह्युमनकाईंड डेव्हलपमेंट ट्रस्ट या संस्थेची स्थापना करण्यात आली.शिक्षण, आरोग्य,कॄषी, सामाजिक व आध्यात्मिक या पाच घटकांवर मागील पंचवीस वर्षांपासून ही संस्था महाराष्ट्राभर काम करीत आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वावलंबनावर भर दिला.त्यांच्या मते भारतातील सर्व खेडी अन्न,वस्त्र, स्वास्थ्य, शिक्षण व विद्धुत या बाबतीत बाबतीत स्वावलंबी होणे गरजेचे आहे या स्वावलंबन फायदा समाजातील तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचला पाहिजे मा.गांधीजींचे हे विचार सत्यात उतरवण्याचे कार्य गीताई ह्युमनकाईंड डेव्हलपमेंट ट्रस्ट करीत आहे व स्वावलंबी खेड्यांची सर्व संकल्पना साकार करीत आहे.येथे जीवनावश्यक सर्व अन्न पदार्थ फार्म मध्ये तयार होतात यासाठी लागणारे बी बियाणे येथेच तयार केले जाते.

शेततळी निर्माण करून पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्णता साधली आहे.फार्म वरील गुरांच्या शेणापासून बायोगॅस तयार करून त्यावर स्वयंपाकासाठी गॅस व १५ केव्हीए ची वीजनिर्मिती करीत आहे.राहीलेल्या शेण व पालापाचोळा पासून गांडूळ खत तयार होते फार्म वर कॄषीमहाविद्यालय सुरू करून संशोधन व मार्गदर्शनाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत अशा रीतीने गांधीजीचे स्वप्न साकार करून या संकल्पनेची ख्याती वाढवण्याचा प्रयत्न चालू आहे .आमखेडा येथील या संकल्पनेचे जनक श्री माणिकरावजी जोगदंड व त्यांचे सुपुत्र तथा गीताई ह्युमनकाईंड डेव्हलपमेंट ट्रस्ट चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अविनाश माणिकरावजी जोगदंड यांनी पद्मश्री डॉ विजय भटकर सर व बिहारचे महामहीम राज्यपाल मा. राजेंद्रजी अलैकर यांची भेट घेऊन त्यांना स्वयंपूर्ण गाव संकल्पनेची सविस्तर माहिती दिली यावेळी प्रसिद्ध सिनेअभिनेते मा.समीर धर्माधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते. 

संस्थेच्या माध्यमातून वाशिम जिल्ह्याच्या शाश्वत विकासासाठी हि संकल्पना संपूर्ण गावामध्ये पोहचवण्याचा मानस अविनाश जोगदंड यांनी यावेळी सांगितले पद्मश्री डॉ विजय भटकर कॄषी महाविद्यालय आमखेडा येथे भेट दिलेली असून त्यांनी बिहार राज्याचे महामहीम राज्यपाल मा.श्री राजेंद्रजी विश्वनाथ अलैकर यांना सर्व माहिती दिली व राज्यपालांनी भेट देण्यास उत्सुकता दाखवली.यावेळी उपस्थितांना कर्मयोगी बाबारावजी जोगदंड कॄषी महाविद्यालय आमखेडांच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आरोग्यवर्धक च्यवनप्राश भेट म्हणून देण्यात आला संस्थेच्या पुढील वाटचालीस बिहारचे महामहीम राज्यपाल मा.राजेन्दजी अलैकर यांनी शुभेच्छा देऊन स्वयंपूर्ण गाव संकल्पनेचे कौतुक केले.यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या च्यवनप्राशचे नियमीत सेवन करणार असे त्यांनी सांगितले.अशी हि माहिती गीताई ह्युमनकाईंड डेव्हलपमेंट ट्रस्ट या संस्थेचे उपाध्यक्ष श्री राजेश घुगे सामाजिक विभाग आमखेडा यांनी वॄत्तपत्राला देण्यास सांगितले