Ticker

6/recent/ticker-posts

मनोज जरांगे यांनी साधला गुरूपिंप्री येथील मराठा समाजाशी संवाद

 


कैलास कोल्हे @ ग्रामीण प्रतिनिधी 

गुरूपिंप्री : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे सोमवार 15 एप्रिल जालना जिल्ह्यात विविध गावांच्या दौऱ्यावर असताना त्यांनी गुरूपिंप्री येथील मराठा बांधवांन सोबत संवाद साधला.  आमरण उपोषण तात्पुरतं स्थगित केल्यानंतर जरांगे पाटील यांनी अनेक ठिकाणी संवाद दौरे चालु आहे. मराठा आरक्षणासाठी  पुढील रणनीती ठरवण्यासाठी ते जालना जिल्ह्यातील सकल मराठा समाज बांधवांसोबत 'संवाद बैठक घेत आहेत. सदरील बैठकीत ते समाजाला मार्गदर्शनपर संवाद ते साधत आहेत. 

गुरूपिंप्री येथील मराठा बांधवांनी मोठ्या उत्साहात त्याचे स्वागत केले. गावातील मोठ्या प्रमाणात लहान व्यक्ती पासुन ते वयोवृद्ध व्यक्ती या संवाद दौरेच्या निमित्ताने गावात उपस्थित होते. गावांतील गरजवंत मराठ्यांनी मनोज जरांगे पाटील यांचे विचार ऐकण्यासाठी उपस्थित राहीले. गावातील मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, तयासाठी आपण संवाद दौरे सुरू केले आहेत. मराठा समाजाला आरक्षण हे मिळाळेच पाहीजे, कारण अनेक वर्षा पासून हा समाज आरक्षण मिळविण्यासाठी संघर्ष करत आहे.  मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही असे त्यांनी सांगितले.