Ticker

6/recent/ticker-posts

आगामी निवडणूक व सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल गावात पोलिसांचा रूट मार्च


सुनिल बांगर  (प्रतिनिधी) :   

आगामी लोकसभा निवडणूक  सण उत्सवाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी. तसेच समाज कंटकांवर व गुन्हेगारांवर वचक राहून, निवडणुका व उत्सव भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात याकरिता आज सायंकाळी दहीहंडा पोलीस विभागाने संवेदनशील समजल्या जाणाऱ्या रेल गावातून रुट मार्च करून सन-उत्सवांमध्ये गोंधळ घालण्याचा विचार असणार्‍यांना चांगलीच समज दिली आहे.

सण उत्सवातील मिरवणुकीतील मोठा जनसमुदाय आणि आगामी निवडणुक लक्षात घेता या दरम्यान कोणी समाज कंटक अशांतता निर्माण करण्याची शक्यता असते. याच दृष्टीकोनातून अशी अशांतता निर्माण करणार्‍यांना समज द्यावी म्हणूनच पोलीस विभागाने आज रुट मार्चचे आयोजन केले होते. रेल गावातील महादेव संस्थान ते गावातील विविध मोहल्ल्यातून मज्जिद परिसरात हा रूट मार्च घेण्यात आला. 

या पोलीस रूट मार्च दरम्यान दहीहंडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार पुरुषोत्तम ठाकरे यांच्यासह  पो.स्टे.दहीहांडा ठाणेदार ठाकरे पो स्टे उप निरीक्षक मुंडे पो.स्टे अंमलदार १३ राज्य राखीव दलाचे पोलीस निरीक्षक,एक राज्य राखीवदलाचे psi 2 SRPF जवान संख्या ४४  RCP प्लाटून क्रमांक एक जवान संख्या २० होमगार्ड जवान १३ पोलीस अधिकारी , कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.