प्रतिनिधि कृष्णा महाले उल्हासनगर
धम्मपाल तेलगोटे यांच्या आदेशानुसार सर्व शहरांमध्ये विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती आदर्श विकास मंडळ च्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरी करावी त्या अनुषंगाने उल्हासनगर गोकुळदास अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली उल्हासनगर शहर तर्फे बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले उल्हासनगर शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांनी महिला आघाडी युवा आघाडी विद्यार्थी कार्यकर्ते व आंबेडकर वादी मोठया संख्येने बाईक रॅली मध्ये सामील झाले
हया बाईक रॅलीची सुरुवात मार्ग महास्थवीर चंद्रमणी बुद्धविहार, लाल-चक्की रोड, डॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक, कुर्ला कॅम्प, कालीमाता मंदिर, नेताजी चौक, व्हिनस चौक, भिम कॉलनी, श्रीराम टॅकीज चौक, पवई ब्रिज, स्टेट बँक ऑफ इंडिया, उल्हासनगर महानगरपालिका, चोपडा कोर्ट येथिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिल्पास विनम्र अभिवादन करुन (परतीचा मार्ग) छत्रपती शिवाजी महाराज चौक, फॉरवड लाईन उल्हासनगर-३ नं, ओ.टी., राजर्षी शाहू महाराज उड्डचन पुल, महास्थवीर चंद्रमणी बुद्धविहार येथे रॅलीचे समारोप.करण्यात आले





Social Plugin