वाई प्रतिनिधी- राहूल पिसाळ-देशमुख.
ओझर्डे : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली घटना ही सर्वसमावेशक असून तळागाळातील माणसासह दीन- दलीत व हलाखीचे जीवन जगणा-यांच्या उन्नतीचा विचार करण्यात आला असल्याचे मत आयु.प्रमोद हणमंत सोनवणे यांनी व्यक्त केले.
ओझर्डे येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना करुन अभिवादन करण्यात आले. तेंव्हा भुईंज चे पोलिस निरीक्षक रमेश गर्जे तसेच काँग्रेसचे सेल जिल्हा अध्यक्ष प्रताप पिसाळ, पोलिस पाटील मयूर कोदे, सदस्य चंद्रकांत रिठे उपस्थित होते.
ओझर्डे येथील बौध्द हितवर्धक मंडळ यांनी अनुयायांसह, समर्थकांसह, इतरांनी बाबासाहेबांचा जयजयकार करत संध्याकाळी शिस्तबद्ध वातावरणात मिरवणूक काढण्यात आली. त्यावेळी अध्यक्ष प्रवीण सोनवणे, उपाध्यक्ष अविनाश सोनवणे, सचिव प्रमोद सोनवणे, खजिनदार संभाजी कांबळे, गौरव सोनवणे, तुषार सोनवणे, साहिल सोनवणे, निलेश सोनवणे, विलास सोनवणे, निखिल सोनवणे, मयूर रिठे, महेश सूर्यनारायण, तरुण सोनवणे, विजय सोनवणे, मनोज सोनवणे, अविनाश कांबळे , तरुण सहकारी आणि महिला भगिनी भरपूर उपस्थीत होत्या . श्री शाहू,फुले, आंबेडकरी विचारवंत श्री. शेखर फरांदे यांनी सुद्धा प्रतीमेस पुष्प गुच्छ अर्पण करून अभिवादन केले. त्यावेळी अजित फरांदे, सागर राऊत, विनोद फरांदे उपस्थित होते.





Social Plugin