Ticker

6/recent/ticker-posts

वावळ्याचीवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात बैल -वासरू ठार

शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान

शहापूर प्रतिनिधी रविंद्र धारवणे 

मोखाडा  तालुक्यातील वावळ्याची वाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये गाय. बैल -वासरू ठार झाल्याची घटना  सायंकाळी घडली.  वावळ्याची वाडी येथील रहीवासी चंद्रकांत येडे रामा खोडके, तुकाराम कतवरे यांच्या गोठ्यात सायंकाळचे वेळी जनावरे नेहमी प्रमाणे बांधली असतांना शिकारीच्या शोधात असलेल्या  बिबट्या जनावरांच्या गोठ्यावर हल्ल्ला चढवीत गोठ्यातील गायीला ठार केले व तल्लीचा दरा मालकी  क्षेत्र  या मालराणावर मृत्यू अवस्थेत बैल वासरू आढळून आलेत . त्यामुळे या परिसरात वाघाची दहशत पसरली आहे.

घटनेची माहिती वन विभागाला मिळताच तात्काळ घटनास्थळी कर्मचारी पोहचले. मृत गायीचा पंचनामा करण्यात आला. गाय मालकाला त्वरित नुकसान भरपाई मिळवून देण्यात यावी अशी मागणी याप्रसंगी गावकऱ्यांनी केली.

सदर बिबट्याचा बंदोबस्त वन विभागाने करावा, या परिसरातून बिबट्याला मोठ्या जंगलात हाकलून लावावे, अशी मागणी माजी सरपंच पांडुरंग कातवारे यांनी केली आहे .