Ticker

6/recent/ticker-posts

भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी


कीर्तीराज घुगे (प्रतिनिधी)

नाशिक - भगवान महावीर स्वामी जन्मकल्याणक महोत्सव समितीतर्फे विविध कार्यक्रम झाले. सकाळी नाशिकरोड परिसरातून शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेचा शुभारंभ महावीर मंदिरापासून होऊन आर्टिलरी सेंटररोड, लिंगायत कॉलनी, देवळालीगाव महात्मा गांधी पुतळा, सुभाषरोड, सत्कार पॉइंट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, मीना बाजार, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बिटको चौक, मुक्तिधाम, दुर्गा उद्यान आदी परिसरातून शोभायात्रा काढण्यात आली. 

तसेच शोभायात्रेत मिठाई, पाणी वाटप करण्यात आले. यावेळी जैन श्रावक संघ, सकल जैन समाज, आनंद व महावीर नागरिक सह. पतसंस्था, भारतीय जैन संघटना, जैन सोशल ग्रुप, अन्नपूर्णा ग्रुप, व्हीआर ग्रुप माहेश्वरी महिला मंडळ, युवा मंच, अजय संघवी प्रतिष्ठान आदींनी सहभाग घेतला होता .