बाळासाहेब पवार प्रतिनिधी
यवतमाळचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी डॉ. पंकज आशीया यांनी आज पथक प्रमुख व पोलिस अधिकारी यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय येथे आढावा बैठकीत निवडणूकविषयक कामकाजाचा आज आढावा घेतला.
यावेळी उपस्थित सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सखाराम मुऴे, तहसीलदार आर. यु. सुरडकर, तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर, गटविकास अधिकारी प्रवीण कुमार वानखडे, नायब तहसीलदार वैभव पवार, नायब तहसीलदार एस. डी. पाईकराव, उमरखेड पोलीस निरीक्षक आदी यावेळी उपस्थित होते.2024 लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लोकसभा मतदार संघातील निवडणूक प्रक्रिया सुरळीत शांततेत व पारदर्शकपणे पार पाडावी, यासाठी नेमण्यात आलेल्या अधिकारी कर्मचारी वर्गाने कर्तव्यात कसूर न ठेवता दक्ष रहावे, असे निर्देश डॉ. आशिया यांनी दिले. 15 हिंगोली लोकसभा मतदार संघात उमरखेड विधानसभा मतदार संघ समाविष्ट आहे. उमरखेड विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र तेथील उपलब्ध सुविधा व सुरक्षा या विषयीचा आढावा घेतला.
निवडणुकीचे काम हे अत्यंत जबाबदारीचे असते. सोपविलेली जबाबदारी अधिकारी-कर्मचारी यांनी पुरेपूर माहिती करून घ्यावी, म्हणजे ती यशस्वीपणे पार पाडण्यास अडचण येणार नाही. ईव्हीएमच्या सुरक्षाबाबत बोलत होते. ईव्हीएम जास्त प्रकाशात उन्हामुळे किंवा मोठ्या प्रकाशात ठेवू नये, अशा सूचनाही डॉ. पंकजा आशिया यांनी दिल्या. मतदान केंद्राच्या ठिकाणी वीज पाणी व इतर आवश्यक सुविधा संबंधित यंत्रणेने तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना ही त्यांनी बैठकीत दिल्या. या निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या आचार संहितेच्या काळात कोणी ही आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी केले.





Social Plugin