पाटण ( दिनकर वाईकर)
महाराष्ट्र,कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले पाटण तालुक्यातील येराड गावचे श्री क्षेत्र येडोबा देवाची यात्रा येत्या मंगळवार ( दि.२३ ) पासून सुरू होत आहे.
पाटण पासून पश्चिमेकडे ६ किलोमिटर अंतरावरील कोयना नदिच्या तीरावर निसर्गरम्य ठिकाणच्या येराड येथील श्री येडोबाचे मंदिर प्रसिध्द आहे. हेमाडपंथी असलेले हे मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिरासमोरील भव्य नंदिची मुर्ती व मंडपातील विशालकाय कासव लक्ष आकर्शीत करूण घेते. प्रवेशद्वारातून मंदिरात प्रवेश केल्या नंतर गाभाय्रातील २ भव्य दगडी मूर्तीचे दर्शण होते. त्यानां रडवे असे संबोधले जाते. श्री येडोबा देव व जोगेश्वरी देवी यांच्या लग्नाच्या वेळी हे देवीचे भाऊ रुसून बसले होते अशी आख्यायिका आहे . मंदिराच्या पूर्वेला श्री नाईकबांचे देवालय असून, समोर आकर्षक दिपमाळ आहे भाविकांचे नवसाला पावणारा देव म्हणून येडोबा देवाची ख्याती आहे. श्री येडोबा देव व जोगेश्वरी देवी यांच्या लग्न झालेले हे स्थान असून जोगेश्वरी देवी ही माता पार्वतीचा अवतार मानली जाते.
एप्रिल महिन्यातील चैत्र पौर्णिमेपासूण या यात्रेला प्रारंभ होतो. ७ दिवसांच्या या यात्रेतील पहिले ३ दिवस महत्वाचे मानले जातात . कोल्हापूर जिल्ह्यातील वाडिरत्नागिरी येथील जागृत देवस्थान श्री जोतिबा मंदिरातील शिधा येराड गावी आणला जातो. व नंतर यात्रेच्या विधिनां प्रारंभ होतो.चैत्र पौर्णिमेदिवशी देवाला तेल चढवले जाते. नेरळे येथील येडोबाची बहीण जानुबाई देवीस करवली म्हणून मान दीला जातो. हनुमान जयंती दिवशी यात्रेच्या पहिल्या दिवशी रात्री १२ वाजता नेरळे येथून जानुबाई देवीची पालखी व मानाचे सासनकाठी ग्रामस्थ , मानकरी व पुजारी आणतात . पौर्णिमेदिवशी मंगळवेढा परिसरातील धनगरी ओव्या म्हणल्या जातात.
पहाटे ४ वाजता देवाच्या लग्ण विधिस प्रारंभ होतो . छबिण्या च्या सासनकाठीचा मान सुरूल , वरकड, काळमवाडी, गुंजाळी, पेठ - नेरळे, नेरळे, वाटेगाव, काले, झाकडे, नाटोशी आदि गावानां दिला जातो.२४ तारखेला दुपारी १२ वाजता लहान छबिना, रात्री १२ ला रात्री चा छबिना. दि २५ रोजीस यात्रेचा मुख्य दिवस . या दिवशी दु १२ वाजता मोठा छबिना, दु ३ वाजता धार घालणिचा विधी व रात्री १२ वा अंधारात यात्रेतील मुख्य रिंगावण विधी होणार आहे.





Social Plugin