बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्री नागनाथ विद्यामंदिर बुध विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला असून प्रथम -फडतरे आदित्य विठ्ठल 92.80% ,द्वितीय - कु .कदम श्रुती किरण 90%,, कु .जगदाळे जानवी अनिल 88% गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहे .विद्यालयातून एकूण 56 विद्यार्थी परीक्षेला बसले होते विशेष प्राविण्यामध्ये 24 विद्यार्थी ,प्रथम श्रेणीमध्ये 24 विद्यार्थीं, द्वितीय श्रेणीमध्ये 7 विद्यार्थी व पास श्रेणीमध्ये एक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे .
या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन सरपंच सौ सुजाता बोराटे ,जिल्हा निवड समितीचे सदस्य व उपसरपंच अभय राजेघाटगे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री चंद्रकांत चव्हाण ,विद्यालयाचे प्राचार्य श्री अंकुश भांगरे , पत्रकार प्रकाश राजेघाटगे , माजी प्राचार्य शेखर घाटगे यानी अभिनंदन केले .तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी प्राध्यापक व विद्यार्थी ,तसेच माता पालक संघ, शिक्षक पालक संघ , शाळा व्यवस्थापन समिती सदस्य बुध व बुध पंचक्रोशीग्रामस्थ सर्वांनी विद्यालयातील शिक्षक व यशस्वी विद्यार्थी यांचे अभिनंदन केले .





Social Plugin