ग्रामीण प्रतिनिधी: शंकर निंबारे देवडोंगरी
हातलोंढी | त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हातलोंढी या गावात २२व्या एसएनएफ वाचनालयाचा दिमाखदार लोकार्पण सोहळा संपन्न झाला. प्राध्यापिका सौ. मिनाक्षी शिंदे -कदम यांच्या हस्ते या वाचनालयाचे उदघाटन झाले. दुर्गम भागातील तरुणांना नोकरी व्यवसायाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने तीन वर्षांपूर्वी सोशल नेटवर्किंग फोरम संस्थेने 'गाव तिथे वाचनालय' ही चळवळ सुरु केली आहे. समाजमाध्यमांवरील समविचारी आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या उत्तम प्रतिसादामुळे ही चळवळ वेगाने आदिवासी भागात पसरली. त्याच श्रुंखलेतील या वाचनालय उभारणीसाठी कै.सुरेखा अरविंद सर्जेराव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आरटीओ बॅच २००४ आणि कदम - सर्जेराव कुटुंबीयांनी आर्थिक योगदान दिले आहे.
वाचनालयाच्या उदघाटन प्रसंगी सौ. अमृता कदम, सौ. उज्वला बोधले, सौ. मनीषा निमसे, सरपंच सुंगध भोये, ग्रामसेविका अलका तरवारे, सौ. मोहिनी पोतदार, श्री. केशव गावित यांची प्रमुख उपस्थिती होती. एसएनएफ वाचनालयांमुळे दुर्गम आदिवासी गावांमध्ये आमूलाग्र सकारात्मक बदल घडत असून या गावातील तरुणांनीही नोकरीच्या संधी मिळवण्यासाठी त्याचा वापर करावा असे आवाहन कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. मीनाक्षी शिंदे कदम यांनी केले. शाळेतील मुलांसाठीही खूप पुस्तकं उपलब्ध करून दिले असल्याने सौ. कदम यांनी शाळकरी मुलांमध्ये वाचन संस्कृती रुजेल अशी अशा व्यक्त केली.
सोहळ्यात प्रथम मान्यवरांच्या हस्ते पुस्तकांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पारंपरिक आदिवासी तालवाद्यांच्या गजरात नृत्याविष्कार करत गावकऱ्यांनी पुस्तकांची मिरवणूक काढून स्वागत केले. पुस्तकांच्या मिरवणुकीत शाळकरी मुलांनी अतिशय उत्साहात सहभाग घेतला. त्यानंतर सर्व मान्यवरांनी वाचनालयाचे औपचारिक उदघाटन केले.
याप्रसंगी SNF चे संस्थापक अध्यक्ष प्रमोद गायकवाड, राहुल कदम, संदीप निमसे, सचिन बोधले ,संदीप बत्तासे, दिलीप चौधरी,आदर्श शिक्षक केशव गावित, मुख्याध्यापक संजय गवळी,नारायण भोये, पूर्णानंद भोये ग्रामस्थ उपस्थित होते. प्रमुख उपस्थिती होती.





Social Plugin