अर्जुन घोडेराव @येवला.
एस.एस.सी. मार्च 2024 शालांत परीक्षेचा निकाल ऑनलाईन जाहीर झाला या परीक्षेत सालाबाद प्रमाणे गुरुदत्त माध्यमिक विद्यालय धामोडे तालुका येवला जिल्हा नाशिक या शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून त्यात शाळेच्या धवल यशाची परंपरा कायम राखणारे विद्यार्थी पुढील प्रमाणे- प्रथम क्रमांक संकेत बाबासाहेब पेंढारे 92.60% द्वितीय क्रमांक गौरव नवनाथ येवले 90.40% तृतीय क्रमांक सार्थक बाळासाहेब डावरे 90.20% तृतीय क्रमांक कुमारी जागृती गोरख भड 90.20% चतुर्थ क्रमांक कुमारी सिद्धी दत्तात्रय भड 89.60% चतुर्थ क्रमांक कृष्णा संपत येवले 89.60% सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक माननीय रामदास आप्पा गायकवाड, सर्व संचालक , मुख्याध्यापक श्री. अर्जुन घोडेराव सर श्री. प्रदीप दारुंटे सर,श्री. एस.एन.गायकवाड सर , श्री. शिवाजी भालेराव सर, श्री. सुधीर आहेर सर आदी सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.





Social Plugin