Ticker

6/recent/ticker-posts

छोटा हत्ती उलटला.४ गंभीर जखमी

 


माहुर तालुक्यातील आष्टा येथील घटना

निलेश जाधव ता.प्रतिनीधी

माहूर तालुक्यातील आष्टा येथील रहिवाशी सावन मोहन जाधव (वय २८ वर्ष हे आपला छोटा हत्ती टेम्पो ( एम.एच.सर्विस बि.ई.9362) घेऊन माहुर कडे येत असताना अचानकपणे टेम्पो रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाल्याची घटना दिनांक २५ रोजी दुपारी दीड वाजता घडली आहे.

आष्टा येथील रहिवाशी सावन मोहन जाधव हे आपल्या छोटा हत्ती टेम्पो ने  आणण्यासाठी माहुरकडे येत होते त्यांचे सोबत आष्टा येथील किसन घासिराम राठोड (वय ७० वर्ष किशोर दत्ता पिंपळे (वय २७ वर्ष अविनाश उत्तम जाधव (वय २६ वर्ष हे होते आष्टा येथून राष्ट्रीय महामार्ग जवळ येत असताना मध्येच वळणावर   टेम्पो अचानक रस्त्याच्या खाली उतरला आणि नालीत जाऊन पलटी झाला यामध्ये चोघेजण गंभीर जखमी झाले 

 माहुरच्या ग्रामीण रुग्णालयात आणले येथे डॉक्टर कृष्णा त्र्यंबकवार यांनी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे पाठविले