Ticker

6/recent/ticker-posts

सर्वधर्मसमभाव म्हणणाऱ्या देशात आता मानव एकतेचा संदेश देण्याची वेळ आली आहे:आ. शशिकांत शिंदे.




 येणाऱ्या काळात लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर समाजात तेढ निर्माण करणाऱ्या विघ्न संतोषी लोकांना बाजूला ठेवने गरजेचे आहे.

 बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ] 

आज सर्व समाजातील लोकांना आपण सुरक्षित असल्याची भावना निर्माण झाली आहे आणि त्याचमुळे भारताची अखंडता व एकात्मता निश्चितच धोक्यात आली आहे. आणि लोकशाही धोक्यात असताना त्याला वाचणे आणि जिवंत ठेवणे ही जबाबदारी तुमच्या आमच्यावर येऊन ठेपली आहे असे प्रतिपादन आमदार शशिकांत शिंदे यांनी केले केले.

     कटगुण येथील मलंग बाबा दर्गा येथे अखिल भारतीय मानव एकता सेवा समितीच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलन चे आयोजन करण्यात आले होते यावेळी या कार्यक्रमास शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आमदार शशिकांत शिंदे यांनी मत व्यक्त केले. यावेळी प्रमुख उपस्थिती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रदीप विधाते, श्रीमद् जगद्गुरु अध्यात्मिक वारकरी गुरुकुल कटगुण चे धीरज महाराज शास्त्री, कटगुण चे सरपंच जयदीप गायकवाड, कटगुण दर्ग्याचे मठाधिपती रहमान शहा बाबा,स्वानंद महाराज मठाधिपती फडतरवाडी, शफिकुल  बाबा, माजी सरपंच हनुमंतराव गायकवाड , मनोज देशमुख, भाई मुल्ला,डॉ.आमिर मुजावर ,डॉ.सविता वाघ, पोलीस पाटील जयश्री गोरे ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल देवकर, बाळासाहेब देवकर, सादिक मनेर,युनूस मुल्ला, अश्फाक शेख, सलीम शिकलगार,मधुकर मोरे, एम.पी गुरव, आदींची होती.

       यावेळी बोलताना आमदार शिंदे यांनी ज्या समाजाने व लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवला त्यांना बरोबर घेऊन जाणे हे आपले पहिले कर्तव्य असते त्याच वेळी कोणतीही जाती धर्माचा दुसरा सर्वांना एकत्र घेऊन तसेच विचारांचे आदान प्रदान करून पुढे कसे जाता येईल हे बघणे महत्त्वाचे आहे सध्याची देशातील परिस्थिती पाहता पुन्हा नव्याने आपल्याला नवीन लढाई उभी करण्याची गरज आहे तसेच लोकशाही जिवंत ठेवायचे असेल तर समोर येणाऱ्या संकटाला करत एकतेच्या बळावर समाजातील काही विघ्नसंतोषी लोकांना बाजूला ठेवून कार्य करण्याची खऱ्या अर्थाने आता वेळ आली आहे सध्या परिस्थितीवर स्पष्ट बोलणे सर्वांनाच अवघड झाली आहे परंतु स्पष्ट बोलून लोकांना जागृत करणे व प्रेरित करण्याची ही वेळ आहे कळवून येथील अखिल भारतीय मानव एकता समितीच्या वतीने गेल्या कित्येक वर्षापासून राबवण्यात येणारा हा उपक्रम सर्वांना आदर्शवत असून प्रत्येकाने मानव एकतेचा संदेश येथून जाताना घेऊन जावा आणि सामाजिक भाईचारा आणि एकता व ऐक्य टिकवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आव्हान यावेळी शिंदे यांनी केले.

     यावेळी धीरज महाराज शास्त्री यांनी उपस्थित समाजाला मार्गदर्शन करताना समाजा समाजात भांडण लावण्याचे सध्या सुरू असलेले प्रयत्न आणि प्रत्येक समाजाच्या धर्मगुरूंचे केले जात असलेले वाटप ही प्रवृत्ती समाजाच्या उद्धारासाठी या संतांनी काम केले त्या संतांचे कार्य डोळे समोर ठेवून जगाची कल्याणासाठी सर्वांनी पुन्हा एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे कटगुण पवित्र भूमी या भूमीतून समाजासाठी जातो संतांनी कधी माणसांच्या मध्ये फरक घेताना आहे कारण संत हे सर्वांच्याच कल्याणासाठी कार्यरत होते निष्ठा एखाद्या प्रति असेल त्याच्या पायावर नतमस्तक होऊन त्यांची प्रामाणिक पने सेवा करा. असे सांगितले.

       यावेळी मलंग  बाबा यांच्या उरूसाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धा तसेच निबंध स्पर्धा मध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या स्पर्धकांचे प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला. प्रास्ताविक मधुकर मोरे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार एम.पी गुरव सर यांनी केले.