Ticker

6/recent/ticker-posts

शासकीय आश्रम शाळा बोरीपाडा १०० टक्के तर ठाणापाडा ९८.७० टक्के निकाल.


ग्रामीण प्रतिनिधी शंकर निंबारे देवडोंगरी 

बोरीपाडा | त्रंबकेश्वर तालुक्यातील बोरीपाडा येथील शासकीय आश्रम शाळेचा इयत्ता बारावी कला व विज्ञान  शाखेचा १००% निकाल लागला आहे. विज्ञान शाखेचे विद्यार्थी ५१ व कला शाखेचे विद्यार्थी ८६ असे एकुण विद्यार्थी १३७ सर्य विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. 

 विज्ञान शाखेतील विद्यार्थी कु. धर्मिष्टा बारकु गारे हिने ७१.६७% गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळविला, कु. मनिषकुमार शांताराम पवार याने ७१.३३% गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळविला. कु. निलम फुलदास राऊत ६९.३३% गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला. तर कला शाखेतील विद्यार्थी कु. जिवन सदु काकड याने ७७.६७% मिळवत प्रथम क्रमांक मिळविला, कु. धिरज सदाशिव माळगावे ७५.८३% मिळवत द्वितीय क्रमांक मिळविला, कु. मिरका विशाल हरीदास ७३.३३% गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला. 

  ठाणापाडा येथील शासकीय आश्रम शाळेचा ९८.७० टक्के निकाल लागला आहे. ८२.३३ टक्के मिळवत कु.कावेरी विष्णू सहारे प्रथम क्रमांक, ७९.०० टक्के मिळवत कु. रुपाली गिरीधर सिताड द्वितीय क्रमांक तर ७८.३३ टक्के मिळवत योगिता अशोक ढोले हिने द्वितीय क्रमांक मिळविला. 

  बोरीपाडा येथील कला व विज्ञान शाखेचे वर्ग सन २००६ साली काॅलेज ओपन झाले असून पहिल्यांदाच शाळेचा १०० टक्के निकाल लागला. या यशाबद्दल शालेय शिक्षण समितीचे आणि मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे तसेच विद्यार्थ्यांचे अभिनंदन परिसरातील पालकांकडून होत आहे.